शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

हुदहूद पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 5:27 PM

हुदहूद (हुप्पू) ग्रामीण भागात (सुतार) या नावाने ओळखला जाणारा पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देडोक्यावर तुरा असलेला व लांब चोच असणारा पक्षी सुतार पक्षी पक्षी म्हणून ओळखला जातो.हुदहूद पक्षी हा प्रामुख्याने खेड्यातील मानवी वस्तीत पहायला मिळत असे. हा पक्षी खेड्यातून लुप्त झाला असल्याने आजमितीस शोधुनही सापडत मिळत नाही.

- संजय उमक

मूर्तिजापूर : बालपणी ग्रामीण भागात हमखास पहावयास मिळणारा व चिमुकल्यांचे आकर्षण असलेला लांब चोच, डोक्यावर काळा तुरा पाठीमागचा भाग काळ्या - पांढऱ्या पट्टेदार पिसांनी व्यापलेला असलेला हुदहूद (हुप्पू) ग्रामीण भागात (सुतार) या नावाने ओळखला जाणारा पक्षी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी पक्षी संवर्धनाची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे पक्षी तज्ञांचे मत आहे.ग्रामीण भागात, डोक्यावर तुरा असलेला व लांब चोच असणारा पक्षी सुतार पक्षी पक्षी म्हणून ओळखला जातो. वास्तविक तो सुतार नसून, त्याचे खरे नाव हुदहूद (लॅटीन : हुप्पू) असे आहे. सुतार पक्षी आकाराने लहान असतो. हुदहूद हा पक्षी गंदगी असलेल्या उकिरडे असलेल्या ग्रामीण परिसरात प्रामुख्याने आढळत असे. या ठिकाणी त्यांचे सहज होणारे दर्शन आता दुर्मिळ व अशक्य झाले आहे. भारतात दोनशेहून अधिक प्रजाती असणारा हुदहूद पक्षी हा प्रामुख्याने खेड्यातील मानवी वस्तीत पहायला मिळत असे. पहाता पहाता हा पक्षी खेड्यातून लुप्त झाला असल्याने आजमितीस शोधुनही सापडत मिळत नाही. अतीशय आकर्षक असलेला हा पक्षी अलीकडच्या काळात एकाएकी लुप्त झाल्याने हा संशोधनाचा विषय ऐरणीवर आला आहे. मातीच्या घरांच्या भिंतीमध्ये आपले घरटे करुन राहणारा हुदहूद आता खेड्यातील कॉंक्रेटीकरण व प्रचंड वृक्षतोड झाल्याने नामशेष झाला आहे. विशेषत: गवताळ भागातील जमिनीत हा पक्षी आपली अनकुचीदार चोच खुपसून त्यातून आपले अन्न शोधून काढत असे. गावाकडील गवताळ भागही राहीला नसल्याने अन्न व भक्ष्य शोधनेही जिकरीचे झाले आहे. त्यामुळे अस्तित्व धोक्यात आल्याने 'हुदहूद' नामशेष झाला असावा असाही अंदाज व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाbirds sanctuaryपक्षी अभयारण्य