शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोना 'रुग्णांच्या वॉर्डात नागरिक जातात कसे? -  पालकमंत्री संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 10:04 IST

पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी मंगळवारी चांगला संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देसुरक्षा यंत्रणेसह संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी ) कोरोनाबाधित रुग्णांच्या वॉर्डात बाहेरील नागरिक जातात कसे, अशी विचारणा करीत, पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी मंगळवारी चांगला संताप व्यक्त केला. यासंदर्भात माहिती घेऊन सुरक्षा यंत्रणेसह संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी ‘जीएमसी’च्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार नितीन देशमुख, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना रुग्णांच्या वॉर्डात बाहेरील नागरिक जात असल्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर रुग्णांच्या वॉर्डात बाहेरील नागरिक जातात कसे, सुरक्षा यंत्रणा काय करते, अशी विचारणा करीत, या मुद्यावर पालकमंत्री बच्चू कडू यांनी चांगला संताप व्यक्त केला. तसेच यासंदर्भात सुरक्षा रक्षकांसह संबंधितांची माहिती सादर करून कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी ‘जीएमसी’च्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जीएमसीमधील कोरोना रुग्णांच्या वॉर्डात बाहेरील कोणीही व्यक्ती जाता कामा नये, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.

‘लो रिस्क’मधील रुग्णांवर लक्ष केंद्रित करा!अकोला शहरातील ‘होम क्वारंटीन’ असलेल्या ‘लो रिस्क’ रुग्णांवर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी मनपा प्रशासनाला दिले. ‘लो रिस्क’मधील रुग्णांपैकी हृदयविकाराचे रुग्ण किती, मधुमेहाचा आजार असलेले रुग्ण किती व ६० वर्षावरील रुग्ण किती, यासंदर्भात यादी तयार करून तपासणी पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

रुग्णांना चांगले जेवण द्या!शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांना चांगल्या दर्जाचे जेवण उपलब्ध करून स्वच्छता राखण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला दिले. तसेच शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात अधिक लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.रुग्णांचा वारंवार आढावा घ्या; मनपाला निर्देश!अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह रुग्ण, त्यामधील हायरिस्क व लो रिस्क रुग्ण किती आणि त्यामधील पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्ण किती, यासंदर्भात वारंवार आढावा घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी मनपा प्रशासनाला दिले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयBachhu Kaduबच्चू कडूAkolaअकोला