शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मतांची घसरण झाली कशी?; जबाबदारीचे हाेणार सुक्ष्म अवलाेकन; भाजपा करणार विचारमंथन

By आशीष गावंडे | Updated: June 20, 2024 18:39 IST

खासदार डाॅ.कराड यांनी घेतला लाेकसभा निवडणुकीचा आढावा, नुकत्याच पार पडलेल्या लाेकसभा निवडणुकीत भाजपने २८ जागांपैकी केवळ ९ जागांवर विजय मिळवला

अकोला: लाेकसभा निवडणुकीत भाजपला विदर्भातून अकाेला व नागपूरचा गड राखता आला. पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी अकाेल्यात दाखल झालेले माजी केंद्रिय राज्यमंत्री तथा खासदार डाॅ.भागवत कराड यांनी मतांच्या घसरणीवर बाेट ठेवले. २०१९ मधील निवडणुकीपेक्षा यंदा ९७ हजार ४१४ मते कमी मिळाल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांवर साेपवलेल्या जबाबदारीचे सुक्ष्म अवलाेकन हाेणार असल्याचे संकेत दिले. हा पक्षातील अनेकांसाठी इशारा मानला जात आहे. 

नुकत्याच पार पडलेल्या लाेकसभा निवडणुकीत भाजपने २८ जागांपैकी केवळ ९ जागांवर विजय मिळवला. पक्षासाठी ही धाेक्याची घंटा असल्याचे ध्यानात येताच राज्यातील ४८ लाेकसभा मतदार संघात जाऊन जय, पराजय या विषयावर मंथन,चिंतन व पदाधिकाऱ्यांसाेबत संवाद साधण्याला प्रारंभ झाला आहे. अकाेला लाेकसभा मतदार संघाची जबाबदारी खासदार डॉ.भागवत कराड यांच्याकडे सोपवल्यामुळे त्यांनी गुरुवारी शहरात दाखल हाेत भाजपच्या काेअर कमिटीमधील सुमारे १६५ पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.

स्थानिक हाॅटेलमध्ये भाजप निवडणूक संचालन समिती व जिल्हा, तालुका संचालन समिती, लोकप्रतिनिधी, मंडळ व आघाडी प्रमुखांच्या बैठकीचे आयाेजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील होते तर मंचावर प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आ.प्रकाश भारसाकळे, आ.हरीश पिंपळे, आ.वसंत खंडेलवाल, महानगराध्यक्ष जयंत मसने, लोकसभा निवडणूक संयोजक विजय अग्रवाल, कृष्णा शर्मा आदी विराजमान होते.

विधानसभेच्या तयारीला लागा!लाेकसभा निवडणुकीत खासदार अनुप धाेत्रे यांच्या विजयात सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा माेठा वाटा आहे. या निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा व महापालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज हाेण्याचे आवाहन खा.डाॅ.कराड यांनी पदाधिकाऱ्यांना केले. महायुतीमधील सर्व घटक पक्षांना व नवीन कार्यकर्त्यांना साेबत घेऊन निवडणुकीला सामाेरे जाण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :BJPभाजपाBhagwat Karadडॉ. भागवत