शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर नागरी पतसंस्थेतील घोटाळा सहा कोटींच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:54 IST

अकोला : बाळापूर शहरातील बाळापूर नागरी पतसंस्थेने गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून केलेला गैरव्यवहार तब्बल सहा कोटींच्या घरात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

ठळक मुद्देअध्यक्ष, संचालक फरारआर्थिक गुन्हे शाखेकडून शोध सुरू

सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाळापूर शहरातील बाळापूर नागरी पतसंस्थेने गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून केलेला गैरव्यवहार तब्बल सहा कोटींच्या घरात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी तथा पतसंस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अँड. सैयद नातीकोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालक गुन्हे दाखल होताच फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या आरोपींचा आर्थिक गुन्हे शाखेने शोध सुरू केला आहे.बाळापूर नागरी पतसंस्थेने आकर्षक व्याजदराचे आमिष दाखविल्याने अनेक ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या होत्या.  ठेवीदारांच्या ठेवींची रक्कम कर्जापोटी वाटल्याचे दाखवून ही रक्कम अध्यक्षासह संचालकांनीच वापरल्याची तक्रार रामदास श्रीराम पराते रा. रंगाहट्टी बाळापूर यांनी अकोला आर्थिक गुन्हे शाखेत केली. या तक्रारीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी प्रकरणाचा तपास करून हा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल तयार केला व याच अहवालाच्या आधारे १६ फेब्रुवारी रोजी अध्यक्षासह संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी प्रकरण बाळापूर पोलिसांकडे पाठविले. यावरून बाळापूर पोलिसांनी बाळापूर नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सै. नातीकोद्दीन सै. हुसामोद्दीन खतीब, उपाध्यक्ष श्याम शेगोकार, संचालक रजीयाबेगम सै. नातीकोद्दीन खतीब, सै. हमीदोद्दीन सै. जमीरोद्दीन, नंदकिशोर पंचभाई, मो. हनीफ मो. मुनाफ, निजामोद्दीन सफीयोद्दीन, सै. मुजीब सै. हबीब, निर्मला श्रीकृष्ण उमाळे, शे. महेबुब शे. हसन, शे. वजीर शे. इब्राहीम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गैरव्यवहार तब्बल सहा कोटींच्यावर असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. यामध्ये ठेवीदारांना मोठा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अध्यक्ष खतीबसह संचालक फरार झाले असून, आर्थिक गुन्हे शाखेने त्यांचा शोध सुरू केला आहे.

साक्षीदारांचे बयाण नोंदविलेआर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणातील साक्षीदारांचे बयाण नोंदविले. यासोबतच गैरव्यवहाराच्या सर्व तांत्रिक बाजूंची प्रक्रिया पूर्ण केली; मात्र या गैरव्यवहारातील आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. यामध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सै. नातीकोद्दीन सै. हुसामोद्दीन खतीब यांच्यासह १३ संचालकांचा समावेश आहे.

बाळापूर नागरी पतसंस्थेतील गैरव्यवहार कोटींच्या घरात आहे. हा आकडा आतापर्यंत तब्बल सहा कोटींवर असल्याचे दिसून येत आहे. तपासात आणखी घबाड समोर येण्याची शक्यता आहे.- गणेश अणे, प्रमुख आर्थिक गुन्हे शाखा.

टॅग्स :BalapurबाळापूरbankबँकCrimeगुन्हा