शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हॉटमिक्स प्लान्ट : कंपनीसह शेतमालकास २.५५ लाखांचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 02:03 IST

अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक  परवानगी न घेता, विनापरवाना ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारणार्‍या पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीसह संबंधित शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार कंपनीसह शेतमालकास संयुक्तरीत्या दंडाची रक्कम १५दिवसांत जमा करावी लागणार आहे.

ठळक मुद्दे१५ दिवसांत भरावी लागणार दंडाची रक्कम 

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक  परवानगी न घेता, विनापरवाना ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारणार्‍या पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीसह संबंधित शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार कंपनीसह शेतमालकास संयुक्तरीत्या दंडाची रक्कम १५दिवसांत जमा करावी लागणार आहे.‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारण्यासाठी  बोरगाव मंजू येथील शेत सर्व्हे नं. २९१/२ अ आणि २९१/ २ ब मधील कमलकिशोर कन्हैयालाल अग्रवाल व जुगलकिशोर अग्रवाल यांची शेतजमीन पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीमार्फत भाड्याने घेण्यात आली. भाड्याने घेतलेल्या २.३६ आर. जमिनीवर संबंधित कंपनीमार्फत ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारण्यात आला; परंतु, भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीवर हॉटमिक्स प्लान्ट सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अकृषक परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे विनापरवाना ‘हॉटमिक्स प्लान्ट’ उभारण्यात  आल्याचे वृत्त गत ६ जानेवारी रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत, विनापरवाना उभारण्यात आलेल्या हॉटमिक्स डांबर प्लान्टची चौकशी करून, अहवाल  सादर करण्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी अकोला तहसीलदारांना गत ६ जानेवारी रोजी दिला होता. त्यानुषंगाने यासंदर्भात महसूल मंडळ अधिकार्‍यांमार्फत चौकशी करून, चौकशीचा अहवाल अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर हांडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. चौकशी अहवालाच्या आधारे अकृषक परवानगी न घेता हॉटमिक्स प्लान्ट उभारणार्‍या संबंधित कंपनीसह शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी ९ फेब्रुवारी रोजी दिला. दंडाची रक्कम १५ दिवसांत संबंधित कंपनीसह शेतमालकाने संयुक्तरीत्या जमा करावयाची आहे,  असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अकृषक परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ संदर्भात करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल अकोला तहसीलदारांकडून प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालानुसार अकृषक परवानगी न घेता हॉटमिक्स प्लान्ट उभारणार्‍या कंपनीसह संबंधित शेतमालकास संयुक्तरीत्या २ लाख ५५ हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश देण्यात आला आहे.- संजय खडसे  उपविभागीय अधिकारी, अकोला.

टॅग्स :Akola cityअकोला शहर