ठळक मुद्देअकोल्याचा प्रभार सोपविलाआज विभागीय आयुक्त प्रदान करणार पुरस्कारसामाजिक जाणिवेतून केली अनेक लोकाभिमुख कामे

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाळापूर येथील उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना सन २०१६-१७ या वर्षांचा महाराष्ट्र शासनाचा अमरावती विभाग स्तरावरील उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना १ आॅगस्ट रोजी महसूलदिनी अमरावती येथे विभागीय आयुक्तांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
अकोला व बाळापूर येथे कार्यरत असताना त्यांनी सामाजिक जाणिवेतून अनेक लोकाभिमुख कामे केली. त्यांनी मिशन दिलासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले, अनाथ मुलांचा शोध घेऊन त्यांना मदत केली, प्रशासकीय कामांमध्ये संगणकाचा वापर करून प्रशासन गतिमान केले, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक अतिशय तत्परतेने केली, तसेच स्पर्धात्मक परीक्षा देणाºया उमेदवारांना मार्गदर्शन केले. त्यांच्या चांगल्या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

अकोल्याचा प्रभार सोपविला
अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) ओमप्रकाश अग्रवाल सोमवारी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे अकोला ‘एसडीओ’ पदाचा अतिरिक्त प्रभार बाळापूरचे ‘एसडीओ’ संजय खडसे यांच्याकडे देण्यात आला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.