Honor of the women on the occasion of World Women's Day | जागतिक महिला दिनानिमित्त भगिनींचा सन्मान
जागतिक महिला दिनानिमित्त भगिनींचा सन्मान

अकोला: सामान्य स्त्रियांसारखे जीवन जगण्याला नकार देऊन, कणखरपणे आव्हाने स्वीकारून परिस्थितीला झुकविले, अशा धाडसी महिलांचे जागतिक महिला दिनानिमित्त मिशन अकोला विकासाच्यावतीने मदन भरगड यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भगिनींचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रमाकांत खेतान, प्रा. शारदा बियाणी, अ‍ॅड. नीलिमा शिंगणे-जगड, छाया मिश्रा, कल्पना देशमुख, पुष्पा देशमुख व साधना गावंडे उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. शारदा बियाणी, अ‍ॅड. नीलिमा शिंगणे-जगड, छाया मिश्रा, कल्पना देशमुख, पुष्पा देशमुख, साधना गावंडे यांच्यासह प्रा. वंदना शिंगणे, हर्षदा सोनोने, राखी जीवतानी, राखी गांधी, रश्मी खंडेलवाल, ऐश्वर्या जयस्वाल, श्रुती कांबळे, गौरी जयसिंगपुरे, साक्षी गायधने, आशा बारस्कर, पूजा रहाटे, माया खत्री, वर्षा पारेख, पुष्पा गुलवाडे, सुषमा निचल, वर्षा बडगुजर, विजया राजपूत, जयश्री भुईभार, संगीता आत्राम, कशीश खान, प्रतिभा नागलकर, सिंधूताई भीमकर, यशोदा गायकवाड, कुसुम भागवत, वीरांगणा भाकरे, संध्या शर्मा, आशा कोपेकर, सुनीता धुरंधर, मीरा खवले, पूजा गुंटिवार, सरल अस्वारे, किरण चितलांगे, कविता गुप्ता, कल्पना गंगासागर, लता लोणारे, राधा शिंगेवार, मंगला सिद्धमुखिया, शशिकला राजपूत, रजनी पवार, अर्पण बघेल, निलेश्वरी जोगी, चंद्रकला सोनकुंवर, उषा रंगारी, काशीबाई माने, सोना पचकुरे, अनिता मडावी यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन राजेश पाटील, गणेश कटारे यांनी केले. राजेंद्र चितलांगे, अभिषेक भरगड, हरीश कटारिया, जावेद खान, संतोष बारस्कर व सुधाकर कोपेकर कार्यक्रमाला उपस्थित होते.
 

 

Web Title: Honor of the women on the occasion of World Women's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.