शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतात काम करणाऱ्या मजुरांवर मधमाशांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 14:09 IST

एक महिला व दोन पुरुष असे तीन मजूर गंभीर जखमी झाले आहे.

खेट्री : पातुर तालुक्यातील चतारी येथे शेतशिवारात शेत मजूरावर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना रविवारी २९ सप्टेंबर रोजीच्या सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.  या घटनेमध्ये महीलासह एकूण १० मजूर जखमी झाले आहे. यापैकी एक महिला व दोन पुरुष असे तीन मजूर गंभीर जखमी झाले आहे. सुकळी येथील महिला व पुरुष मजूर चतारी येथील गणेश रामभाऊ ढोरे यांच्या शेतात मजुरीने काम करण्यासाठी आले होते.  शेतातील झाडाखाली जेवण करण्यासाठी बसले असता, शेजारच्या शेतात कपाशी पिकावर फवारणी सुरू होती. फवारणीचा धूर लागताच झाडाखाली जेवणासाठी बसलेल्या महिलासह मजुरावर मधमाशांनी हल्ला चढवला घाबरलेल्या मजुरांनी आरडाओरडा करून चतारी गावाकडे धाव घेतली चतारी गावकऱ्यांनी माणुसकीचा परिचय देऊन पुढाकार घेऊन रुग्णांना जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले, काही जखमींनी खाजगी रुग्णालयात धाव घेतली ,५ जखमींवर चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी झालेल्या मजुराचे नावगोपाल वासुदेव अंबोरे, सुखदेव भिसे, चित्राबाई जयराम अंबोरे, हे तीन मजूर गंभीर जखमी झाले आहे. तर लिलाबाई वासुदेव अंबोरे, हरीश वासुदेव अंबोरे, सागर बबन वानखडे, रानी बबन वानखडे, अनिता बबन वानखडे, संदीप जाधव, व इतर एक जण असे सात जण जखमी झाले आहे. यापैकी ५ जखमींवर चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. उर्वरित जखमिनी खाजगी रुग्णालयात धाव घेतली आहे.मधमाशांनी गावापर्यंत केला पाठलागमधमाशांनी शेतात मजुरावर हल्ला तर केलाच पण मजुरांनी स्वतःला वाचविण्यासाठी गावाकडे धाव घेतली असता, मधमाशांनी मजुराचा गावापर्यंत पाठलाग करून हल्ला केला त्यामुळे मजुरांची एकच तारांबळ उडाली होती.

मधमाशांनी हल्ला केल्याचे चातारी ग्रामीण रुग्णालयात ५ जखमी रुग्ण आले आहे. त्या सर्वांना भरती करून चतारी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे.- डॉ.असद फहीम, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय,  चतारी

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरFarmerशेतकरी