शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
2
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
3
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
4
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
5
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
6
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
8
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
9
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
10
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
11
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
12
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

बेघरांच्या निवाऱ्यासाठी अकोला मनपात हालचाली; शासन वाढीव निधी देण्यास तयार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2018 1:19 PM

अकोला: शहरातील बेघर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्देनिवारा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाने वर्षभरापूर्वी मंजूर केलेल्या २ कोटी २४ लाखांमध्ये वाढीव १८ लाखांचा निधी मंजूर करण्यास शासनाने संमती दिली आहे. त्यानुषंगाने मनपाकडे प्राप्त निविदेची टिप्पणी स्थायी समितीकडे सादर केली जाणार आहे.

अकोला: शहरातील बेघर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. निवारा उभारण्यासाठी शासनाने वर्षभरापूर्वी मंजूर केलेल्या २ कोटी २४ लाखांमध्ये वाढीव १८ लाखांचा निधी मंजूर करण्यास शासनाने संमती दिली आहे. त्यानुषंगाने मनपाकडे प्राप्त निविदेची टिप्पणी स्थायी समितीकडे सादर केली जाणार आहे.महापालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) च्या माध्यमातून मनपा प्रशासनाने शहरातील बेघर व्यक्तींना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त आहे. मनपाच्या ‘एनयूएलएम’ विभागाने वर्षभरापूर्वी शहरात बेघर व्यक्तींचा शोध घेतला असता मोहिमेत दीडशे बेघर व्यक्ती आढळून आले होते. संबंधित व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने सुरुवातीला जिल्हा होमगार्ड कार्यालयाची जागा निश्चित केली. नगररचना विभागाने जागेची पाहणी करून इमारतीचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे सादर केल्यानंतर बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया राबवली. यावेळी अचानक प्रशासनाने जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या जागेत बदल करून मनपा शाळा क्रमांक २ ची निवड केली. या कालावधीत इमारत बांधण्यासाठी शासनाने २ कोटी २४ लाख निधी मंजूर केला. इमारतीची निविदा जीएसटी लागू होण्यापूर्वी प्रकाशित झाली होती. जीएसटी लागू झाल्यामुळे अतिरिक्त रकमेचा भरणा करण्याच्या मुद्यावरून निविदा सादर करणाºया कंत्राटदारांनी हात आखडता घेतला. त्यानंतर बांधकाम विभागाने फेरनिविदा काढणे अपेक्षित होते. तसे न केल्यामुळे ही प्रक्रिया थंड बस्त्यात होती. निधी उपलब्ध असूनही प्रशासन निवारा उभारत नसल्याबाबत लोकमतने पाठपुरावा केला. निवारा उभारण्यासाठी निविदा सादर करणाºया कंत्राटदारांनी जीएसटीमुळे वाढीव दराची निविदा सादर केली होती. त्यामुळे बांधकामाच्या रकमेत वाढ झाली. ही बाब लक्षात घेता ३० जानेवारी रोजी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत वाढीव १८ लाख रुपये निधी मंजूर करण्यास शासनाने हिरवी झेंडी दिली.स्थायीकडे पाठवणार टिप्पणीनिवारा उभारण्यासाठी मनपाकडे तीन निविदा प्राप्त झाल्या आहेत. यापैकी मेस्ट्रो नामक कंपनीची निविदा कमी दराची आहे. ही निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीकडे सादर केली जाणार आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाgovernment schemeसरकारी योजना