शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाला मानवंदना; बाबासाहेबांचा जयघोष निनादला!

By राजेश शेगोकार | Updated: April 14, 2023 16:16 IST

जयंंती उत्साहात साजरी: अशोक वाटिकेत अनुयायांची उसळली गर्दी.

राजेश शेगाेकार, अकोला: महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती  १४ एप्रिल रोजी अकोला शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. अकाेला शहरातील अशोक वाटिकेत आंबेडकरी अनुयायांची गर्दी उसळली. हजाराे अनुयायांनी युगप्रवर्तक डाॅ.बाबासाहेबांचा जयघोष केला.  शहरातील विविध भागात बौध्द विहारांमध्ये सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. तसेच कार्यक्रम आणि उपक्रमांव्दारे बाबासाहेबांना वंदन करण्यात आले.

सकाळी शहरातील अशोक वाटिका येथे सकाळपासूनच भगवान गौतम बुध्द, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्प आणि पुष्पहार अर्पण  करण्याासाठी गर्दी उसळली हाेती भारतीय बौध्द महासभेच्यावतीने सामूहिक त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले तसेच समता सैनिक दलाच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून महामानव डाॅ.बाबासाहेब यांना मानवंदना देण्यात आली. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्थांच्यावतीने महामानवाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले.पुस्तके, प्रतिमांची दुकाने अन् गर्दीने फुलली अशोक वाटिका !

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशोक वाटिका परिसरात महापुरुषांच्या जीवन कार्यावरील विविध पुस्तके तसेच प्रतिमा, मूर्ती व पूजा साहित्याची दुकाने लावण्यात आली होती. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांकडून पुस्तके, प्रतिमा व पूजेचे साहित्य खरेदी करण्यात येत होते. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या गर्दीने अशोक वाटिका परिसर फुलून गेल्याचे दिसत होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीAkolaअकोला