शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शहापूर सिंचन प्रकल्पात गोलेल्या सिताफळांच्या झाडांविषयी उच्च न्यायालयाची  विचारणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 20:39 IST

भुसंपादनात जमीन गेलेल्या त्या शेतकर्‍यांनी कोणत्या वर्षी सी ताफळांची किती झाडे लावली होती. त्या झाडांना आलेले सीताफळ कधी  आणि कुठे विकले याची संपूर्ण माहिती तीन आठवड्यात शपथपत्राव्दारे सादर  करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भूसंपादन  अधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हा कृषि  अधिकार्‍यांना २१ नोव्हेंबर रोजी दिले. 

ठळक मुद्देशहापूर सिंचन प्रकल्पाचे भूसंपादन शपथपत्राद्वारे माहिती सादर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: भुसंपादनात जमीन गेलेल्या त्या शेतकर्‍यांनी कोणत्या वर्षी सी ताफळांची किती झाडे लावली होती. त्या झाडांना आलेले सीताफळ कधी  आणि कुठे विकले याची संपूर्ण माहिती तीन आठवड्यात शपथपत्राव्दारे सादर  करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भूसंपादन  अधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हा कृषि  अधिकार्‍यांना २१ नोव्हेंबर रोजी दिले. अकोला जिल्ह्यातील शहापूर सिंचन प्रकल्पासाठी वडाळी देशमुख  गावातील  जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीची व जमिनीवरील  फळझाडांची भरपाई ठरवतांना शासकीय अधिकार्‍यांनी मोठय़ा प्रमाणात  गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करुन  दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अकोट येथील  मोहन पांडे यांनी दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य  न्यायमूर्ती  मंजुळा चेल्लूर आणि न्या.पी.बी.वराळे यांच्या खंडपीठात  मंगळवारी या  याचिकेवर सुनावणी झाली. २00९-१0 मध्ये प्रकल्पासाठी काही शेतकर्‍यांची  जमीन संपादित करण्यात आली. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकार्‍यांनी  जमिनीवरील फळझाडांचे मुल्यांकन करुन ११ मे २0१२ रोजी तर, भूसंपादन  अधिकार्‍याने जमिनीचे मुल्यांकन करुन १६ जुलै २0१४ रोजी अहवाल सादर  केला. या जमिनीवर सीताफळांची झाडे असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात  आले होते. त्यानुसार मुल्यांकन करुन संबंधित शेतकर्‍यांना ३ कोटी १८ लाख  १५ हजार ४८0 रुपयांचा मोबदला म्हणून देण्यात आला होता. मात्र सात  बाराच्या उतार्‍यात तूर, कापूस आणि केळीची झाडे असल्याचे स्पष्ट झाले होते.  याकडे खंडपीठाचे लक्ष वेधण्यात आले. यानंतर खंडपीठाने सिताफळाच्या  झाडा संदर्भात विचारणा करीत शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले.   याचिकेमध्ये जमीन संपादित करण्यात आलेल्या  शेतकर्‍यांमध्ये वडाळी  देशमुख गावातील अण्णापूर्णा डोरले, कमलाबाई बोडखे, पार्वताबाई बोडखे,  विजय देशमुख, अरुण आकोटकर, रामचंद्र आकोटकर, सुधीर आकोटकर व  विलास आकोटकर यांचा  समावेश असून या शेतकर्‍यांची जवळपास ११ हे क्टर जमीन संपादित करण्यात आली. याचिकेमध्ये गृह विभागाचे सचिव,  पोलीस महासंचालक , अकोला जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी  अभियंत्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अँड.उज्वल  देशपांडे तर प्रतिवादीतर्फे  शेतकर्‍यांतर्फे   अँड.खापरे, अधिकार्‍यांतर्फे  अँड.ए.आर.देशपांडे यांनी बाजू मांडल

टॅग्स :Telharaतेल्हाराWaterपाणी