शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पीक नुकसानात लिंबूचा समावेश करून शेतकऱ्यांना मदत द्या! -  नितीन देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 14:21 IST

आमदार नितीन देशमुख यांनी शुक्रवारी मुंबईत राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली.

अकोला: विदर्भात लिंबूचे सर्वाधिक उत्पादन बाळापूर-पातूर तालुक्यात घेतले जाते. परतीच्या पावसामुळे या दोन्ही तालुक्यांतील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या पीक विमा योजनेत लिंबूचा समावेश करून कृषी विभागाने सर्वच पिकांचा केलेला सर्व्हे विमा कंपनीला बंधनकारक करण्याच्या मुद्यावर शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी शुक्रवारी मुंबईत राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. यावर दोन्ही विषय निकाली काढण्यासंदर्भात कृषी सचिव डवले यांनी आश्वस्त केले.परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीन व मका या पिकांसह फळबागा अक्षरश: भुईसपाट झाल्या आहेत. शेतकºयांवर आलेल्या अस्मानी संकटातून त्यांना दिलासा देण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या स्तरावर शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे. परतीच्या पावसाने सर्वत्र नुकसान केल्यामुळे पीक विमा काढणाºया कंपनीच्या फेरसर्वेक्षणाची आवश्यकता राहिली नसल्याच्या मुद्यावर बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी शुक्रवारी राज्याच्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ज्या शेतकºयांनी पीक विमा काढला नसेल, त्यांनाही मदतीसाठी पात्र ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. विदर्भातून लिंबूचे सर्वाधिक उत्पादन जिल्ह्याच्या बाळापूर व पातूर तालुक्यात घेतले जाते.संततधार पावसामुळे लिंबू उत्पादनाला मोठा फटका बसल्यामुळे पीक नुकसानात लिंबूचा समावेश करण्याची मागणी आ. देशमुख यांनी सचिव एकनाथ डवले यांच्यासोबत चर्चेदरम्यान केली.

टॅग्स :AkolaअकोलाNitin Deshmukhनितीन देशमुखFarmerशेतकरी