शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस; वीज कोसळून दोघांचा मृत्यू

By रवी दामोदर | Updated: June 11, 2024 22:04 IST

जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस

रवी दामोदर, अकोला: जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात टिपटाळा येथे अंगावर वीज कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना दि.११ जून रोजी उघडकीस आली आहे. याप्रकरणी तलाठ्यांनी अहवाल सादर केला आहे. तसेच खापरखेडा शिवारातही एका युवकाचा वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती आहे.  जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मूर्तिजापूर तालुक्यातील टीपटाळा येथील  शालिग्राम श्रीराम डोंगरे (६५)हे त्यांच्या शेतात झाडाखाली थांबले असताना  वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ब्रह्मी खुर्द येथील तलाठी यांनी अहवाल दिला आहे.  दुसऱ्या घटनेत मौजे खापरवाडा येथील शुभम राजेंद्र टापरे (२६) या युवकाचा सोपान टापरे यांच्या शेतात मृतदेह आढळून आला असून, त्यांचा विजेमुळे मृत्यू झाला अशी माहिती आहे.जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊसभारतीय हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्रातर्फे अकोला जिल्ह्यात दि. ११ ते १६ जूनदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यादरम्यान वा-याचा वेग ताशी ४० ते ५० किमी असेल, असा अंदाज आहे. नागरिकांनी वादळाच्या स्थितीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे. झाडाखाली थांबू नये. वीज चमकत असताना मोबाईल, वीजेची उपकरणे बंद ठेवावी. वाहने वीजेचा खांब व झाडे यापासून दूर ठेवावीत, अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने केली आहे.

टॅग्स :RainपाऊसAkolaअकोला