शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीचा तडाखा : होलसेल किराणा धान्य बाजारातील दुकानांमध्ये शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 10:46 IST

Heavy rains hit grocery stores : दुकानांमधील धान्य, कडधान्य, डाळी आणि किराणा साहित्य भिजल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे.

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात अकोला शहरातील होलसेल किराणा व धान्य बाजारातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे दुकानांमधील धान्य, कडधान्य, डाळी आणि किराणा साहित्य भिजल्याने दुर्गंधी पसरली असून, दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बुधवार, २१ जुलै रोजी जिल्हयात रात्रभर मुसळधार पाऊस बरसला असून, अतिवृष्टी झाल्याने गुरुवार २२ जुलै रोजी जिल्हयातील नदी व नाल्यांना पूर आला. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्हयात शेती आणि पिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामध्येच अकोला शहरातील गंगा नगर भागात होलसेल किराणा व धान्य बाजाराला अतिवृष्टीचा तडाखा बसला. होलसेल मार्केटमधील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने दुकानामधील धान्य, कडधान्य, विविध प्रकारच्या डाळींची पोती तसेच किराणा साहित्य पाण्यात भिजले. धान्य, डाळी आणि किराणा साहित्य भिजल्याने दुर्गंधी दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे अतिवृष्टीच्या तडाख्यात होलसेल किराणा व धान्य बाजारातील दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

डाळी आणि किराणा साहित्य!

पावसाचे पाणी दीड ते दोन फूट दुकानांमध्ये शिरल्याने, दुकानांमधील मूग, उडीद, हरभरा, तूर, मसूर, मठ, बरबटी, हरभरा इत्यादी प्रकारच्या डाळी तसेच काबुली हरभरा, वाटाणा, तांदूळ असे धान्य आणि खडीसाखर, चारोळी, काजू, सोयावडी, जिरे, खोबराखिस, हळद, चिंच, सोप आदी प्रकारचे किराणा साहित्य भिजले आहे. पाण्यात भिजलेल्या धान्य व साहित्याची दुर्गंधी पसरली आहे.

‘चारोळी’वर चढली बुरशी!

दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने धान्य, डाळी व विविध किराणा साहित्य पाण्यात भिजले. त्यामध्ये पाण्यात भिजलेल्या चारोळीचे खडे तयार झाले असून, त्यावर बुरशी पसरल्याचे चित्र एका दुकानात आढळून आले.

 

भिजलेल्या बरबटीला फुटले कोंब; वाटाणा, हरभरा, मठाच्या घुगऱ्या!

अतिवृष्टीच्या तडाख्यात पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने कडधान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. त्यामध्ये पाण्यात भिजलेल्या बरबटीला पोत्यातच कोंब फुटले असून, वाटाणा, हरभरा, मठ आदी कडधान्याच्या घुगऱ्या झाल्याचे वास्तव आहे.

 

नुकसानाचे पंचनामे सुरू!

अतिवृष्टीमुळे होलसेल किराणा व धान्य बाजारातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानाचे पंचनामे संबंधित तलाठी व कर्मचाऱ्यांमार्फत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत.

दुकानदार, व्यापारी म्हणतात....!

अतिवृष्टी झाल्याने होलसेल किराणा व धान्य बाजारातील ६० ते ७० दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे दुकानांमधील धान्य, कडधान्य व किराणा साहित्य पाण्यात भिजले असून, दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन शासनाने नुकसानग्रस्त दुकानदारांना मदत दिली पाहिजे.

रमाकांत खेतान

अध्यक्ष, होलसेल किराणा व धान्य मार्केट सोसायटी, अकोला.

 

 

दुकानात दीड फूट पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे दुकानातील कडधान्ये, डाळी व इतर साहित्य भिजले असून, पाण्यात भिजलेल्या धान्याची दुर्गंधी येत असल्याने हे धान्य व कडधान्ये उपयोगात येणार नाही. नुकसानाचे पंचनामे सुरू असून, नुकसान भरपाईची मदत तातडीने मिळण्याची गरज आहे.

श्यामलाल

दुकानदार, होलसेल किराणा व धान्य बाजार.

 

होलसेल किराणा व धान्य बाजारातील दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने धान्य, कडधान्ये व विविध किराणा साहित्य भिजले. त्यामुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान असून, तीन दिवस उलटल्यानंतरही अद्याप नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले नाही. पंचनामे तातडीने पूर्ण करून, दुकानदारांना तातडीने नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.

मनोहर पंजवाणी

व्यापारी, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसMarketबाजारfloodपूर