शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मूर्तिजापूर तालुक्यात संततधार; नदी-नाल्यांना पूर, जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 15:09 IST

मूर्तिजापूर - मूर्तिजापूर तालुक्यात गत तीन दिवसापासुन सुरु असलेला संततधार पाऊस थांबता थांबत नसुन, आज  तालुक्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने राजनापूर खिनखीनी, कुरुम, कवठा, मंडूरा, रामटेक, कासारखेड, कार्ली, माना आकोली, सैदापुर, नवसाळ ही गावे पाण्याखाली आली असून सर्वात जास्त नुकसान कुरूम, राजनापूर, खिनखीनी, कवठा, सैदापुर या गावात झाल्याची माहिती असून, ही ...

ठळक मुद्देआतापर्यंत मूर्तिजापूर तालुक्यात आतापर्यंत 560 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  कुरूम, राजनापूर, खिनखीनी, कवठा, सैदापुर या गावात झाल्याची माहिती असून, ही गावे जलमय झाली आहे.पोही- माना, कवठा - कुरूम या गावा दरम्यान मोठे नाले असल्याने संपर्क तुटला आहे

मूर्तिजापूर - मूर्तिजापूर तालुक्यात गत तीन दिवसापासुन सुरु असलेला संततधार पाऊस थांबता थांबत नसुन, आज  तालुक्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने राजनापूर खिनखीनी, कुरुम, कवठा, मंडूरा, रामटेक, कासारखेड, कार्ली, माना आकोली, सैदापुर, नवसाळ ही गावे पाण्याखाली आली असून सर्वात जास्त नुकसान कुरूम, राजनापूर, खिनखीनी, कवठा, सैदापुर या गावात झाल्याची माहिती असून, ही गावे जलमय झाली आहे. आतापर्यंत मूर्तिजापूर तालुक्यात आतापर्यंत 560 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पोही- माना, कवठा - कुरूम या गावा दरम्यान मोठे नाले असल्याने संपर्क तुटला आहे   रात्री उशिरा अचानकपणे उपरोक्त गावांच्या परीसरात पावसाने रौद्ररूप धारण केल्याने गावालगत असलेले अंबर नाला, मोरीमाय नाला, जामठी नाला, सैदापुर नाला, कवठा, खिनखीनी  हे सर्व नाले तुडुंब भरून वाहू लागले.प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी नाल्यातून पुढे जात नव्हते. नाल्याचे बांध फुटून पाणी गावात शिरले गावात शिरलेल्या पाण्याने गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  पाणी शेतात शिरल्याने गावा लगत व नाल्यांच्या परीसरातील शेत जमीनीवरील पिके अक्षरशः खरडून गेले आहे.राजापूर येथील जिल्हा परिषद शाळा परीसरात पहाटे ५ वाजता फुट पाणी असल्याने तेथील सहादेव सोळंके, रामदास हिवराळे, बबनराव सेजव, तुळशीराम सेजव, मनोज कडू, मुकुंदा भागवत विनोद चक्रे, मारोतराव गाडगे, यांच्या घरात पाणी शिरल्याने या कुटुंबीयांना जिल्हा परिषद शाळा व महादेव मंदिरात स्थानांतरीत करावे लागेले यामध्ये यांच्या घरातील अन्नधान्य ओले झाले व महादेव सोळंके यांनी अनुदान घरकुलबांधण्यासाठी आणलेले १५ पोती सिमेंट वाया गेले आहे. कवठा सोपीनाथ येथील बाळू बाजड यांचे मातीत बांधकाम असलेले अर्धे घर पडून त्यात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे असून कुठलीही जीवितहानी झाली नाही.

   कुरूम इथेही हिच परिस्थिती असून इतवारा, आठवडी बाजार, माळीपूरा, शिवनगर, मेन रोड, पंचशील विद्यालय, भोईपुरा, चांभारपूरा, मातंगपूरा, जामठी रोड मुस्लिम वस्ती या परीसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने १० कुटुंबांना जिल्हा परिषद शाळेत स्थानांतरीत करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. कुरुम गावालगत राष्ट्रीय महामार्ग जात असून महामार्गाचे काम चालु आहे. या कामा मुळे गावा बाहेरून वाहणाऱ्या होळी नाल्याचे पाणी पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. तसे या नाल्याला काही अंतरावर चार नाले येऊन मिळत असल्याने नाल्याचे पाणी गावात शिरले आहे यात येथील गावकऱ्यांच्या अन्नधान्याचेय नुकसान झाले आहे.   आपत्ती ग्रस्त गावांना आमदार हरीष पिंपळे, नायब तहसीलदार माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे, फरताडे, विस्तार अधिकारी व्ही व्ही किर्तने हे भेटी देत आहेत.

 हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गत ती दिवसांपासून संततधार पावसामुळे तालूक्यातील हजारो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली आली असून शेतीला तळ्याचे स्वरूप आले आहे जलमय झालेल्या शेतातील पिके सडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे तर अनेक गावांना पुराचा तडाखा पसरल्याने त्या परीसरातील जमीन खरडून गेल्या ने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. 

पोलीसांच्या सतर्कतेने वाचले दोघांचे प्राणकुरूम नजीक राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून या रस्त्याचे काम करणारे दोन मजूर रस्त्यालगत शेतात एका घरात अडकून पडले होते. तेथे असलेल्या नाल्याला प्रचंड प्रमाणात पुर असल्याने त्यांचा जीव टांगणीला लागला होता. माना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंदू पाटील यांनी प्रसंगावधान राखून महादेव गुणाजी वऱ्हेकर (६५) विकास नामक मजूरांना पाण्यात दोर टाकून पोहणे येत असलेल्या व्यक्तीला व्यक्तीला त्यांच्या पर्यंत पोहोचवीले आणि त्यांच्या कमरेला दोर बांधून त्यांना लोकांच्या मदतीने बाहेर काढून त्यांचे प्राण वाचविले.

सतत तीन दिवसांपासून पासून पाऊस पडत असल्याने आम्ही नैसर्गिक आपत्ती कडे लक्ष ठेवून आहेत काही भागात अचानक अतिवृष्टीमुळे तालूक्यातील कही गावात पाणी शिरले आहे आपत्ती निवारण व पाहणी करण्यासाठी आमची टिम घटनास्थळी दाखल झाली आहे. सध्या परीस्थितीत पावसामुळे नुकसानाचा अधिकृत आकडा सांगणे शक्य नसले तरी पाहणी करून नुकसानग्रस्त लोकांना शासकीय मदत मिळण्यासाठी शासनाकडे आढावा सादर करणार आहे. नुकसानग्रस्तांना निश्चितच शासकीय मदत मिळेल.- भागवत सैंदाणे , उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरmonsoon 2018मान्सून 2018