हिवरखेड : पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या अडगाव येथे जिल्हा परिषद शिक्षकास मारहाण केल्याची घटना ६ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता घडली. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी दोघांविरु द्ध गुन्हा दाखल केला. अडगाव येथील किशोर मधुकर कोल्हे हे दुचाकीने अकोट येथे जाण्यासाठी निघाले होते. ६ एप्रिल रोजी दुपारी ११.३० वाजता गावातीलच सुभाष रामदास ढोकणे व अरुण रामदास ढोकणे या दोघांनी उर्दू शाळेजवळ कोल्हे यांची दुचाकी अडवून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध कलम ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील एक आरोपी जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे. पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे करीत आहेत.
शिक्षकास मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: April 8, 2017 00:59 IST