शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धनवानी, संतानीच्या जामिनावर आज सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 02:03 IST

अकोला : मुंबईतून कोकेनचा बेकायदा गोरखधंदा करून अकोल्यातील बड्या धनदांडग्यांच्या मुलांना कोकेन विक्री व खरेदी करणार्‍या दोघांच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विक्की धनवानी व रितेश संतानी असे या दोघांची नावे असून, अन्य आरोपींचा अद्यापही शोध लागला नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देकोकेन जप्ती प्रकरण; अन्य आरोपींचा अद्याप शोध नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मुंबईतून कोकेनचा बेकायदा गोरखधंदा करून अकोल्यातील बड्या धनदांडग्यांच्या मुलांना कोकेन विक्री व खरेदी करणार्‍या दोघांच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विक्की धनवानी व रितेश संतानी असे या दोघांची नावे असून, अन्य आरोपींचा अद्यापही शोध लागला नसल्याचे वास्तव आहे.अकोल्यातील बड्या धनदांडग्यांच्या मुलांसाठी आणण्यात येणारे ४२.१५ ग्रॅम कोकेन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी रेल्वे स्टेशन परिसरातून जप्त केले होते. या कोकेनची राज्यातील किंमत दोन लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवासी विजय ऊर्फ बाबू चंदू हिरोळे (१९) याला अटक केली होती. हिरोळे हा मुंबईतील रहिवासी तसेच मूळचा नायजेरिया येथील ‘जेम्स’ ऊर्फ लुक चिक इजियानी रा. मीरा रोड नामक व्यक्तीकडून कोकेनची खरेदी करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. यावरून रामदासपेठ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जेम्सचा शोध घेत मुंबईतून अटक केली. हिरोळे व जेम्स या दोघांच्या चौकशीतून सिंधी कॅम्पमधील विक्की घनश्यामदास धनवानी आणि रितेश कन्हैयालाल संतानी हे दोघे अकोल्यातील कोकेनचे खरेदीदार असल्याची माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे सदर दोघांना ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने प्रयत्न केले; मात्र दोन्ही खरेदीदारांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर नियमित जामीन अर्जावरील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विक्की घनश्यामदास धनवानी आणि रितेश कन्हैयालाल संतानी या दोघांनी कोकेनची खरेदी केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, त्यांच्या आणखी साथीदारांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

कोकेनमुळे अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळीकोकेनची बेकायदा खरेदी व विक्री प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे; मात्र यामागे असलेल्या सूत्रधारांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. संतानी व धनवानी दोघांनी तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळविला असल्याने पोलिसांना तपासात अडचणी निर्माण होत असल्याची माहिती आहे. कोकेन जप्त करताच यामध्ये अकोल्यातील बड्या धनदांडग्यांची नऊ मुले सहभागी असल्याचे समोर आले होते; मात्र त्यानंतर केवळ दोनच नावे समोर आली असून, अन्य नावे अद्यापही गुलदस्त्यात आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा