शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचार्‍यांअभावी आरोग्य उपकेंद्र वार्‍यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:32 IST

माळेगाव बाजार : दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या माळेगाव बाजार येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविकेचे पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असून, उपकेंद्र नेहमी बंद राहत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

ठळक मुद्देगावातील रुग्णांचे हाल ढगाळ वातावरणामुळे विविध आजारांमध्ये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कमाळेगाव बाजार : दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या माळेगाव बाजार येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविकेचे पद गेल्या दोन महिन्यांपासून रिक्त असून, उपकेंद्र नेहमी बंद राहत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांचे मात्र या बाबीकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.या उपकेंद्रात आरोग्यसेविका नवृत्त झाल्यापासून हे रिक्त पद न भरल्यामुळे गावात आरोग्याच्या सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. यामुळे आरोग्य सेवेबद्दल ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. १0 हजार लोकवस्तीच्या गावात अद्यापही आरोग्य उपकेंद्राची इमारत बनलेली नाही. जुन्या चावडीत सदर दवाखाना आहे. या उपकेंद्रामध्ये आरोग्यसेविका, आरोग्यसेवक व कंत्राटी आरोग्यसेविका असे तीन कर्मचारी कार्यरत असून, याआधी आरोग्यसेविका वगळता इतर दोन कर्मचारी मुख्यालयी तर राहतच नाहीत; मात्र आरोग्यसेवकाचे साप्ताहिक दर्शनही होत नाही. याविषयी आरोग्यसेविकेचे महत्त्वाचे रिक्त पद भरून रुग्णांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी होत आहे. 

गावात विविध आजारांमध्ये वाढगावात येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सुविधा नसल्यामुळे आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे. आरोग्य उपकेंद्र परिसरात मोकाट जनावरांचा संचार असतो. आजूबाजूने सर्वत्र घाण पसरल्याने अस्वच्छता या ठिकाणी निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे विविध आजारांमध्ये वाढ झाली असून, आरोग्यसेविकेचे पद रिक्त असल्यामुळे गरज गरीब नागरिक, गरीब शेतकरी या ठिकाणी गोळ्या व औषधाकरिता येत असतात; मात्र आरोग्यसेविका नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे. या बाबीकडे संबंधित अधिकारी व पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष असल्याने पद रिक्त आहे. येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेविकेची त्वरित नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र  दानापूर  अंतर्गत येणार्‍या  माळेगाव बाजार या उपकेद्रातील आरोग्यसेवक व सेविकांची पदे रिक्त आहेत. या रिक्त जागांविषयी जि.प.च्या आरोग्य विभागाला माहिती सादर केली आहे. रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार आहेत.-डॉ.एस.जी.बोडखे, वैद्यकीय अधिकारी,दानापूर

टॅग्स :Healthआरोग्य