शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:06 IST

३१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हास्तर, तालुकास्तर व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४ तास साथरोग नियंत्रण कक्ष सुरू राहणार असल्याची माहिती डॉ. वसंत सरनाईक यांनी दिली.

अकोला: पावसाळ््यात साथरोगावर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाले असून, ३१ आॅक्टोबरपर्यंत जिल्हास्तर, तालुकास्तर व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर २४ तास साथरोग नियंत्रण कक्ष सुरू राहणार असल्याची माहिती डॉ. वसंत सरनाईक यांनी दिली.पावसाळ््यात साथरोगावर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज झाले असून, सोमवारी हिवताप विभागातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सरनाईक माहिती देताना बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने साथरोग नियंत्रणासाठी कंबर कसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील एकूण ५३५ ग्रामपंचायती तसेच ८२९ गावांमध्ये साथरोग नियंत्रणासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ३१ आॅक्टोबरपर्यंत सर्वोपचार रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आरोग्य उपकेंद्रांमध्ये साथरोग नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून, हे कक्ष २४ तास सेवा पुरविणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. तसेच १५९ जोखीमग्रस्त, पुराचा धोका नदी काठच्या गावांकडेही विशेष लक्ष देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. साथरोग नियंत्रण कक्षात २१ प्रकारच्या अत्यावश्यक औषधांसोबतच स्वतंत्र किट्स उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हास्तरावर एक शीघ्र प्रतिसाद पथक कार्यरत केले असून, जिल्हास्तरावर पाच, तर तालुकास्तरावर सात वैद्यकीय पथके कार्यरत राहणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य