शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य मेळाव्यात पहिल्याच दिवशी साडेसात हजारावर नागरिकांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 18:41 IST

अकोला : नागरिकांना संभाव्य आजारापासून वाचविण्यासाठी पंतप्रधान आयुष्यमान योजनेअंतर्गत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रांगणात आयोजित दोन दिवसीय आरोग्य मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी जिल्हाभरातून आलेल्या साडे सात हजारावर नागरिकांच्या विविध आरोग्य चाचण्या करण्यात आल्या.

अकोला : नागरिकांना संभाव्य आजारापासून वाचविण्यासाठी पंतप्रधान आयुष्यमान योजनेअंतर्गत येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रांगणात आयोजित दोन दिवसीय आरोग्य मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी शनिवारी जिल्हाभरातून आलेल्या साडे सात हजारावर नागरिकांच्या विविध आरोग्य चाचण्या करण्यात आल्या. खासदार संजय धोत्रे यांच्या पुढाकाराने आयोजित या आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधिर सावरकर, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. खिल्लारे, उपसंचालक आरोग्य डॉ. फारूखी, शासकीय महाविदयालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या अधिक्षीका डॉ. आरती कुरवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी काश्मिर येथील भ्याड हल्यात शहिद झालेल्या जवांनाना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आरोग्य उपसंचालक डॉ फारूखी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी महापौर सुमनताई गांवडे , नगरसेविका गितांजली शेगोकार, सारिका जयस्वाल , डॉ. विनोद बोरडे , महानगरपालिकाचे नगरसेवक , नगरसेविका तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात , महानगराध्यक्ष किशोर मांगटेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी केले. तर संचालन अ‍ॅड. शुंभागी खोंडे यांनी केले.मल्टिस्पेशालिटी सुविधाया मेळाव्यात कर्करोग, ह्दयरोग, मधुमेह, मोतीबिंदू, किडनीचे उपचार , मेंदूरोग, व इतर दुर्धर आजारावर तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. यासाठी सर्वोपचार रूग्णालय व शासकीय वैदयकीय महाविदयालय येथे सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविदयालय , सर्वोपचार रूग्णालय , आयएमए , निमा आदींचे ८२ ४ डॉक्टरांच्या सेवा घेण्यात आलेल्या आहेत. स्त्रीयांचे स्तन कर्करोग व गभार्चा कर्करोग यासाठी मॅमोग्राफी सुविधा तसेच एक्स रे, सोनोग्राफी,विविध चाचण्यांसाठी पॅथोलॉजीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एमआरआयसुध्दा काढुन दिला जाणार आहे. ह्दय रोगासाठी इको कार्डीओग्राफीची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तसेच रुग्णांसाठी औषधीही उपलब्ध करुन दिली आहेत. यासाठी औषधीचे स्टॉल लावण्यात आले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रेHealthआरोग्य