शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

स्क्रब टायफसवर नियंत्रणासाठी हातरुण गावात आरोग्य पथक घरोघरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 15:31 IST

हातरुण(जि.अकोला): स्क्रब टायफस ने बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग खबळून जागा झाला असून, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले.

ठळक मुद्देस्क्रब टायफस सदृश आजाराची लागण झालेल्या नुसरत परवीन जमीर अहेमद ४२ वर्षीय महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला.त्यामुळे स्क्रब टायफस या आजाराविषयी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी उंदराचे पिंजरे लावून किटकाचा शोध घेण्यात येत असून तसेच घरोघरी जाऊन तापाचे औषध देण्यात आले.

हातरुण(जि.अकोला): स्क्रब टायफस ने बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग खबळून जागा झाला असून, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून गावात सर्वेक्षण करण्यात आले.स्क्रब टायफस सदृश आजाराची लागण झालेल्या नुसरत परवीन जमीर अहेमद ४२ वर्षीय महिलेचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे स्क्रब टायफस या आजाराविषयी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रविवारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पथकाने मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या घरातील सदस्यांची वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम गिरी यांनी तपासणी केली.या पथकाकडून ताप आणि किटक सर्वेक्षणासह विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आरोग्य पथकाकडून गावातील नागरिकांचा ताप नमुना सर्वेक्षण करण्यात आले. तसेच किटक सर्वेक्षणावरही यावेळी भर देण्यात आला. काही ठिकाणी उंदराचे पिंजरे लावून किटकाचा शोध घेण्यात येत असून तसेच घरोघरी जाऊन तापाचे औषध देण्यात आले. स्क्रब टायफस् या आजाराची गंभीर दखल घेत संपूर्ण गावात आरोग्य प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. हातरुण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भुस्कुटे, डॉ. गिरी यांच्या पथकासोबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे गुलवाडे, डोंगरे, कानपूरे, डाबेराव, कांडलकर, वाळणे, श्रीमती गावंडे, श्रीमती महाजन, श्रीमती ढेंगे, श्रीमती वेले, श्रीमती इंगळे, श्रीमती गवात्रे सहभागी झाले होते. ग्रामपंचायत ने गावात दंवडी देऊन स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले आहे.रक्त नमुन्यांची तपासणी!आरोग्य विभागाच्या पथकाकडून हातरुण येथील नागरिकांच्या रक्तजल नमुने घेण्यात आले. पथकाकडून तापीच्या रुग्णाचे संकलीत नमुणे तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात येतील. अशी माहिती डॉ. गिरी यांनी दिली.सर्वेक्षणाद्वारे किटाणुचा शोध!आरोग्य विभागाच्या पथकाकडून रविवार आणि सोमवारी ताप सर्वेक्षण करण्यात आले. तसेच रक्तजल नुमने संकलित करण्यात आल्यानंतर किटक सर्वेक्षणाद्वारे किटाणुचा शोध घेण्यात आला.गावात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून तापीच्या रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. घर व परिसराची स्वछता ठेवण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.- डॉ. भुस्कुटे,प्रा. आरोग्य केंद्र, हातरुण.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य