युनियन बँकेकडून द्वेषपूर्ण पाेलीस कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:25 AM2021-09-16T04:25:35+5:302021-09-16T04:25:35+5:30

रूपचंदनगरमधील ज्या डुप्लेक्सची तक्रार युनियन बँकेने रामदासपेठ पाेलीस ठाण्यात केली आहे़ त्याच डुप्लेक्सच्या पश्चिम दिशेला असलेले एक डुप्लेक्स ...

Hateful Paelis action by Union Bank | युनियन बँकेकडून द्वेषपूर्ण पाेलीस कारवाई

युनियन बँकेकडून द्वेषपूर्ण पाेलीस कारवाई

Next

रूपचंदनगरमधील ज्या डुप्लेक्सची तक्रार युनियन बँकेने रामदासपेठ पाेलीस ठाण्यात केली आहे़ त्याच डुप्लेक्सच्या पश्चिम दिशेला असलेले एक डुप्लेक्स माेहम्मद इरफान व त्यांची पत्नी बुशरा अंजुम यांना ६ ऑगस्ट २०१९ राेजी विक्री केले हाेते़ त्यांनी युनियन बँकेतून ३१ लाख ३२ हजार रुपयांचे कर्ज घेतले, तर सर्व दस्तावेजही पडताळणी करण्यात आले हाेते़ माेहम्मद इरफान यांच्या पूर्वेस असलेले दुसरे डुप्लेक्स माेहम्मद इरफान यांचे जवळचे नातेवाईक रियाज खान व त्यांच्या पत्नी शाहिस्ता परवीन यांनी खरेदी केले हाेते़ या डुप्लेक्सवरही त्यांनी ३१ लाख ३२ हजार रुपयाचे कर्ज घेतले आहे़ या डुप्लेक्सच्याही सर्व दस्तावेजांची पडताळणी बँकेने केलेली आहे़ मात्र बँक प्रशासनातील काही अधिकाऱ्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी केल्याने, त्यांनी आपल्यावर आकसपूर्ण ही कारवाई केल्याचा आराेप अभियंता माेहम्मद सफवान यांनी केला आहे़

भ्रष्टाचाराची एप्रिलमध्येच सीबीआयकडे तक्रार

दरम्यान, या बँकेचा शाखा व्यवस्थापक अतुल माेहाेड याने माेहम्मद सफवान यांना लाच मागितली हाेती़ या प्रकरणाची तक्रार एप्रिल महिन्यातच सीबीआयकडे केल्याची माहिती सफवान यांनी दिली़ तसेच या प्रकरणाची तक्रार अर्थमंत्रालयापर्यंत झाल्यानंतर माेहाेड याची तडकाफडकी बदली करण्यात आली हाेती़ सफवान यांनी तत्कालीन शाखा व्यवस्थापकाविरुद्ध तक्रार केल्यानेच त्यांच्याविरुद्ध पाेलिसात तक्रार करण्यात आली आहे़ ही तक्रार खाेटी असल्याने याविराेधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़.

Web Title: Hateful Paelis action by Union Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.