शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

हार्दिक पटेलच्या मार्गदर्शनात शुक्रवारी अकोल्यात युवा एल्गार मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 14:12 IST

अकोला : विदर्भातील शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय्य हक्कासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उभारलेल्या युवा आक्रोश मोर्चानंतर गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ युथ फोरमद्वारे युवा एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देहार्दिक पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ युथ फोरमद्वारे युवा एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विदर्भ युथ फोरमच्या माध्यमातून घेण्यात येणारा हा मेळावा बिगर राजकीय असल्याचे सांगण्यात येत आहे. संग्राम गावंडे या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष असल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अकोला : विदर्भातील शेतकरी व सुशिक्षित बेरोजगारांच्या न्याय्य हक्कासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने उभारलेल्या युवा आक्रोश मोर्चानंतर गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भ युथ फोरमद्वारे युवा एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अकोल्यातील मेळाव्याचे स्वागताध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे असल्याने हा मेळावा राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे. लोकसभा, विधानसभा व जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी बांधणी सुरू केली असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही कंबर कसली आहे.  त्या दृष्टीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विदर्भात गत सहा महिन्यात दौरे केले. राष्ट्रवादीची यंग ब्रिगेड असलेल्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी विदर्भातील दमदार नेतृत्व संग्रामभैया गावंडे यांची विदर्भ समन्वयकपदी वर्णी लावत पक्षाची धुरा युवा नेतृत्वाकडे दिली. संग्राम गावंडे यांनी विदर्भात सभा, बैठका, मेळाव्यांचा धडाका लावत शहरासह ग्रामीण भागात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विदर्भातील शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांवर संग्राम कोते पाटील यांच्या मार्गदर्शनात संग्राम गावंडे यांनी अकोला, वाशिम, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली येथे युवा आक्रोश मोर्चे काढून सत्ताधारी भाजपविरुद्ध रणशिंग फुंकले.  या मोर्चात युवाशक्तीचा वाढता सहभाग राष्ट्रवादीला नवचेतना देणारा ठरला. राष्ट्रवादीची ही वाढती घौडदौड अशीच कायम ठेवण्यासाठी संग्राम गावंडे यांनी आता विदर्भ युथ फोरमच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अकोल्यात शुक्रवारी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार मेळावा आयोजित केला आहे.  विदर्भ युथ फोरमच्या माध्यमातून घेण्यात येणारा हा मेळावा बिगर राजकीय असल्याचे सांगण्यात येत असले तरी संग्राम गावंडे या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष असल्याने राजकीय पदाधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता डॉ. सुधीर ढोणे मेळाव्याचे अध्यक्ष आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस सरकारविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने हातात हात घेतल्याचे यावरून दिसून येत आहे. गुजरातमध्ये काँग्रेसची ताकद वाढविणारे हार्दिक पटेल या मेळाव्याचे मुख्य बिंदु आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोलाhardik patelहार्दिक पटेल