शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

बाश्रीटाकळीतील अवैध जल वाहिन्यांवर हातोडा

By admin | Updated: January 17, 2015 01:29 IST

अकोला महापालिकेची आज कारवाई; पोलिसांची घेणार मदत.

अकोला : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीवरून पाण्याची चोरी रोखण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. बाश्रीटाकळी येथील अवैध जलवाहिन्यांचे कनेक्शन तोडण्यासाठी मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी मनपाचा मोठा ताफा ग्रामपंचायतच्या हद्दीत धडकणार असून, याकरिता स्थानिक पोलिसांची मदत घेतली जाईल. मनपाच्या इतिहासात अशी कारवाई पहिल्यांदाच होणार असल्याने याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.महान धरणातून अकोलेकरांना पाणीपुरवठा केला जातो. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर ६५ एमएलडी व २५ एमएलडीचे प्लान्ट आहेत. यापैकी २५ एमएलडी प्लान्टमधून पाणीपुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीद्वारे बाश्रीटाकळी ग्रामपंचायतला पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर अकोला शहराला पाणीपुरवठा होतो. याबदल्यात बाश्रीटाकळी ग्रामपंचायतकडून रीतसर पाणीपट्टी वसूल केली जाते. यादरम्यान ग्रामपंचायत हद्दीतील जलकुंभापर्यंत पाणी पोहोचत नसल्याने नागरिकांनी चक्क मुख्य जलवाहिनीला ठिकठिकाणी फोडून पाण्याची पळवापळवी सुरू केली आहे. बाश्रीटाकळी गावात तब्बल २४ ठिकाणी जलवाहिनीवर ह्यटॅपिंगह्ण करून पाण्याची चोरी केली जात आहे. ह्यटॅपिंगह्णवरून एकाच वेळी अनेक नागरिकांना पाणीपुरवठा होण्यासाठी नळांचे स्टॅन्ड तयार करण्यात आले आहेत. असे स्टॅन्ड गावात ठिकठिकाणी दिसून येतात. अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी जास्त अवधी लागत असल्याचा गैरफायदा घेत, गावामध्ये मनपाच्या पाण्याचा फुकटात दिवसभर वापर सुरू असतो. पाणीपट्टी थकीत ठेवण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. याचा परिणाम अकोला शहराला होणार्‍या पाणीपुरवठा योजनेवर होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, पाण्याच्या पळवापळवीला चाप लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मनपातील जलप्रदाय विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील काळे यांनी मुख्य जलवाहिनीवरून पाण्याची चोरी होत असल्याची तक्रार बाश्रीटाकळी पोलीस ठाण्यात केली होती. १७ जानेवारी रोजी मनपाचा संपूर्ण ताफा बाश्रीटाकळी ग्रामपंचायतच्या हद्दीत अवैध नळ कनेक्शन तोडण्यासाठी रवाना होणार आहे. कारवाईसाठी मनपाची यंत्रणा सज्ज झाली असून, सुरक्षा रक्षक, जेसीबी, ट्रकसह वरिष्ठ अधिकारी कारवाईत सहभागी होतील. बंदोबस्तासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात येत आहे. बाश्रीटाकळी ग्रामपंचायत क्षेत्रात मनपाच्या मुख्य जलवाहिनीवरून पाण्याची खुलेआम चोरी होत आहे. यासंदर्भात आम्ही जिल्हा परिषद प्रशासनासह ग्रामपंचायतीला सतत पत्रव्यवहार करून अवगत केले आहे. शिवाय कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. एकूणच अवैध नळ कनेक्शन तोडण्याची नितांत आवश्यकता आहे. शनिवारी कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याचे प्रभारी कार्यकारी अभियंता सुनील काळे यांनी स्पष्ट केले. *२ कोटी ८0 लाखांची पाणीपट्टी थकीतबाश्रीटाकळी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना मनपाकडून पाणीपुरवठा केला जातो. याबदल्यात ग्रामपंचायतीकडून रीतसर पाणीपट्टी जमा करणे भाग असताना तब्बल २ कोटी ८0 लाखांची पाणीपट्टी थकीत असल्याची माहिती आहे. मलकापूर ग्रामपंचायतकडेदेखील कोट्यवधीची पाणीपट्टी थकीत असून, याकडे मनपाचे दुर्लक्ष होत आहे.