शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वान धरणातील निम्म्या पाण्याचाच होतो वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 15:38 IST

मागील दहा वर्षांची पाणी वापराची आकडेवारी बघितल्यास उपलब्ध जलसाठा पुर्ण वापरलाच नसल्याचे आकडेवारीवरू न समोर येत आहे.

- राजरत्न सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या वान सिंचन प्रकल्पातील पाण्याचा अर्धाही वापर होत नसल्याने दरवर्षी विसर्ग करावा लागत असून, यावर्षी जेवढे पाणी प्रकल्पात उपलब्ध आहे तेवढेच ८० दश लक्ष घनमीटर पाणी सोडावे लागल्याने पाण्याचा मोठा अपव्यय होत असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हा प्रकल्प २००१ मध्ये बांधून तयार झाला.या प्रकल्पाच्याची जलाशय पातळी ४११.६९ मीटर असून, यावर्षी ८०.४४ टक्के दश लक्ष घनमीटर (९८.१५ टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. पर्वताच्या कुशीत असल्याने या प्रकल्पाची रचना चहाच्या कपासारखी खोल असून, या भागात हमखास पाऊस पडत असल्याने प्रत्येक पावसाळ््यात हा प्रकल्प लवकरच ओव्हरफ्लो होत असल्याने दोन-चार वर्ष सोडले तर या प्रकल्पातून हमखास पाण्याचा विसर्ग करावा लागतो. परिणामी पाण्याचा अपव्यय होत असून, यावर्षीही ८० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.विशेष म्हणजे जूनमध्येया धरणाची पातळी शून्य ठेवण्याचे नियोजन आहे. या धरणातून आजमितीस शेगाव नगर परिषद, जळगाव जामोद, १४० खेडी संग्रामपूर , ८४ खेडी, अकोट व तेल्हारा पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करण्यात येतो. मागच्यावर्षी या प्रकल्पात पाणी संचयित झाले तेव्हापासून २०१९ च्या जूनपर्यंत पिण्याच्या पाण्यावर जवळपास ३० तर सिंचनाचाठी २७.२८७ दश लक्ष घनमीटर पाण्याचा वापर करण्यात आला. असे असूनही २१ दश लक्ष घनमीटरच्यावर पाणी या प्रकल्पात शिल्लक होते.मागील दहा वर्षांची पाणी वापराची आकडेवारी बघितल्यास उपलब्ध जलसाठा पुर्ण वापरलाच नसल्याचे आकडेवारीवरू न समोर येत आहे. २००१ मध्ये प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर २००२-२००३ मध्ये ७१.५२६ दशलक्ष घनमीटर पाणी संचय झाला होता. त्यावर्षी ४,५९६ हेक्टरवर सिंचन करण्यात आले. त्यावेळी ४.६ दलघमी पाणी पिण्यासाठी वापरण्यात आले.

वान प्रकल्पात दरवर्षी५० टक्के जलसाठा शिल्लक राहत असून, पाणी शून्य ठेवण्याचे नियोजन आहे. यावर्षी प्रकल्पात जेवढे पाणी आहे तेवढ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पाण्याचा वापर सिंचनासाठी करावा.- अनिकेत गुल्हाने,सहायक अभियंता श्रेणी-१वान प्रकल्प.

टॅग्स :AkolaअकोलाWan Projectवान प्रकल्प