शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्याच्या पायथ्याशी फुलली हळदीची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 13:55 IST

अकोट :- सातपुड्याच्या पायथ्याशी आता थेट हळदीच्या भट्या लागत असल्याचे चित्र आहे. परंपरागत पिकांना फाटा देत शेतकरी आता वन औषधे व इतर पिके घेण्याकडे वळला असल्याचे सुखदायक चित्र पहावयास मिळत आहे.

- विजय शिंदे

अकोट :- सातपुड्याच्या पायथ्याशी आता थेट हळदीच्या भट्या लागत असल्याचे चित्र आहे. परंपरागत पिकांना फाटा देत शेतकरी आता वन औषधे व इतर पिके घेण्याकडे वळला असल्याचे सुखदायक चित्र पहावयास मिळत आहे.कापूस, तूर, सोयाबीन, गहू, ज्वारी आदी पारंपरिक पिके या भागात घेतल्या जातात. त्यानंतर संत्रा, केळी या फळबागांकडे शेतकरी वळला; मात्र खरीप हंगाम वगळता बाजारात मागणी असलेली पिके घेण्याकडे शेतकरी वळला आहे. कमी खर्चात, कमी दिवसात जास्त उत्पन्न देणाऱ्या हळद लागवडीने सातपुडा बहरला आहे. हळदीचे उत्पादन घेण्यापासून तर हळद बॉईल करून पॉलीश केल्यानंतर ती तयार करेपर्यंतच्या भट्ट्या शेतकऱ्यांनी आता शेतात लावल्या आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी मलकापूर गोंड येथील परिसरात अक्षय संजय तळोकार या युवा शेतकºयाने दोन एकर हळद पेरली. वाडेगाव येथून हळदीचे ११८५ किलो बेणं घेऊन आठ महिन्यांपूर्वी दोन एकरात लागवड केली. या लागवडीनंतर खत, फवारणी, मजुरी असा एकूण ९८ हजार रुपयांचा खर्च केला. हळदीचे पीक बहरल्यानंतर ते काढून १९ हजार क्विंटल ओली हळद झाली. ती हळद बॉईल करून सुकविल्यानंतर तयार केली असता, ४० क्विंटल हळदीचे पीक झाले. बाजार भावानुसार या शेतकºयाने प्रतिक्विंटल सात हजार रुपये भावाने ती हळद विक्री केल्यानंतर दोन लाखाच्या आसपास नफा कमावला. स्वयंपाकघरात हळद मसाल्याचे पदार्थ म्हणून वापरल्या जाते. शिवाय तिचे औषध गुणधर्म सर्वज्ञात आहेत. बाहेरगावावरून येणाºया हळदीची गुणवत्ता पाहता सातपुड्याच्या पायथ्याशी तयार झालेली हळद कितीतरी पटीने उत्कृष्ट असल्याचे हळद उत्पादक शेतकरी अक्षय तळोकार यांचे म्हणणे आहे. आता तर थेट ठोकच नव्हे तर चिल्लर भावातसुद्धा या भागातील शेतकºयांनी हळदीची घरोघरी व बाजारपेठेत विक्री सुरू केली आहे. या माध्यमातून अतिरिक्त रोजगाराची निर्मिती शेतकरी करीत आहेत. अकोट तालुक्यात आधीच दुष्काळसदृश परिस्थिती असताना खरीप हंगामानंतर बागायती पिके संकटात आहेत. अशा स्थितीत हळदीसारख्या पिकांनी मजुरांनासुद्धा रोजगार मिळवून दिल्याचे दिसून येते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटFarmerशेतकरी