शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान शाळांमध्ये राबविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 01:34 IST

अकोला : शिक्षण विभागाच्यावतीने ३ ते २६ जानेवारीदरम्यान ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राज्यातील ४0८ तालुक्यांमधील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत राज्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे३ ते २६ जानेवारीदरम्यान अभियान शाळा स्तरावर विविध उपक्रम

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शिक्षण विभागाच्यावतीने ३ ते २६ जानेवारीदरम्यान ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राज्यातील ४0८ तालुक्यांमधील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत राज्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचा आराखडा महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे यांनी शिक्षणाधिकार्‍यांना पाठविला आहे. या आराखड्यानुसार शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.  इंग्रजी शाळांकडे वाढलेला पालकांचा ओढा, जिल्हा परिषद शाळांना लागलेली विद्यार्थ्यांची गळती पाहता, शासनाने ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान सुरू केले आहे. विशेषत: ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांविषयी आकर्षण वाढले असून, आपली मुले-मुली दर्जेदार इंग्रजी शाळांमध्ये शिकविण्यासाठी पालक धडपड करताना दिसून येतात. त्यातही जिल्हा परिषद शाळांमधील मुलींची संख्या दिवसेंदिवस घसरत आहे. सोबतच गरीब परिस्थितीमुळे अनेक मुलींना शिक्षण अध्र्यावर सोडावे लागते. जिल्हा परिषद शाळांमधील मुलींची संख्या कमी होऊ नये, या दृष्टिकोनातून शिक्षण विभागाच्यावतीने राज्यातील ४0८ तालुके व शहरांमध्ये ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. विद्यार्थिनींना शिक्षण घेता यावे, त्यांनी शाळा सोडू नये, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत. विद्यार्थिनी शिक्षणापासून दूर जाऊ नयेत, म्हणून शासनाने विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्त्यासोबतच सायकल भेट, मोफत पाठय़पुस्तके, गणवेशासाठी अनुदानसारख्या योजना सुरू केल्या आहेत. ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा, अभियान अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थिनींना या सर्व योजनांचा लाभ देण्यात येऊन त्यांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाने जिल्हय़ातील शाळा निश्‍चित करून त्या शाळांमध्ये लेक शिकवा अभियान राबविण्यात येणार आहे. 

जिल्हय़ातील ४३४ शाळांमध्ये उपक्रमराज्यातील शाळांसोबतच जिल्हय़ातील ४३४ शाळांमध्ये ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. ३ ते २६ जानेवारीदरम्यान प्रभात फेरी, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन, जीवन चरित्र, बालिका दिनाची प्रतिज्ञा, एकांकिका सादरीकरण, शाळाबाहय़ मुले, मुलींची यादी जाहीर करणे, माता मेळावा व खेळ,  बालिका दिन प्रतिज्ञा, कृतज्ञता मेळावा, लेक वाचवा, लेक शिकवा विषयावर रांगोळी प्रदर्शन, माजी विद्यार्थी गौरव, शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मुलाखती, दिव्यांग यशस्वी उद्योजक, नोकरदाराची मुलाखत, शाळाबाहय़ मुला-मुलींच्या पालक भेटी, पथनाट्याद्वारे जनजागृती, स्थलांतरीत पालकांच्या मुलींना शाळेत दाखल करणे यांसह विविध उपक्रम होणार आहेत.

कन्यारत्न असलेल्या माता-पित्यांचा सन्मान होणारएक किंवा दोन कन्या अपत्यांवर थांबलेल्या माता-पित्यांचा शिक्षण विभागामार्फत शाळा स्तरावर सन्मान होणार आहे, तसेच नाते मैत्रीचे, मायलेकीचे हा माता मेळावा होणार आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थिनींची होणारी कमी संख्या पाहता, शाळांमध्ये ३ ते २६ जानेवारीदरम्यान ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. विद्या प्राधिकरणाने दिलेल्या वेळापत्रकानुसार शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. - प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.

टॅग्स :Akola cityअकोला शहरSchoolशाळा