शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

जप्तीतील ४५ लाखांचा गुटखा जाळला

By admin | Updated: November 19, 2014 02:11 IST

अकोला येथील अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही.

अकोला - अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलिस प्रशासन आणि महापालिकेचा एलबीटी पथक यांनी विविध ठिकाणी छापे घालून जप्त केलेला तब्बल ४५ लाख रुपयांचा गुटखा मंगळवारी जाळण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांसोबतच पोलिस प्रशासन व एमआयडीसी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीमध्ये फेज क्रमांक ४ मध्ये हा गुटखा जाळण्यात आला.राज्यात २0१३ पासून गुटखाबंदी केली आहे. गत दोन वर्षांपासून लागू असलेल्या गुटखाबंदीनंतरही मध्य प्रदेश व हैद्राबादमधून मोठय़ा प्रमाणात गुटखा आणला जातो. बंदीच्या काळात अव्वाच्या सव्वा किंमत लावून गुटखा माफियांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. गुटखाबंदी अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाने माफियांवर नजर ठेवून गुटखा जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.तथापि, तोकड्या कर्मचारी वर्गामुळे त्यांना मोठय़ा प्रमाणात छापे घालून गुटखा जप्त करणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिस प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तरीत्या कारवाई केली. अश विविध छाप्यांदरम्यान जप्त केलेला सुमारे ४५ लाख रुपयांचा गुटखा मंगळवारी जाळण्यात आला. गुटख्याचा हा माल गत अनेक दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात होता. मंगळवारी आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर त्याला आगीच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शरद कोलते, अन्न निरीक्षक नितीन नवलकार, प्रशांत अजिंठेकर, रावसाहेब वाकडे, राजेश यादव यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.