अकोट (जि. अकोला) : अकोट शहर पोलिसांची गुटखा माफीयांविरुद्धची कारवाई सुरूच असून, सोमवारी पोलिसांनी कारवाई करताना १० हजार रुपयांचा गुटखा व १२ हजार रुपये किमतीची मोटर सायकल असा एकूण २२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले.अकोट शहर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस निरीक्षक डी.एन फड संजय घायल, गोपाल अघडते, राकेश राठी, सुल्तान पठाण विजय सोळंके यांची चमू मिळालेल्या गोपनीय माहिती वरून कृषी विद्यालय जवळ दबा धरून बसली. यावेळी शे. मेहबूब अब्दुल लियाकत (रा. घसेंटिपूरा) हा त्याच्या मोटारसायकलवरून महाराष्ट्र सरकार ने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला वाहून नेत असल्याचे आढळून आले. त्याची चौकशी केली असता मोटर सायकल ला बांधलेल्या पोतडीमध्ये गुटखा व पान मसाला आढळून आला. अंदाजे १० हजार रुपये किमतीचा गुटखा व पान मसाला व १२ हजार रुपये किमतीची मोटर सायकल असा एकूण २२ हजाररुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ,पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन अकोट शहर च्या गुन्हे शोध पथकाने केली.
अकोटात पकडला १० हजारांचा गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 16:14 IST
अकोट (जि. अकोला) : अकोट शहर पोलिसांची गुटखा माफीयांविरुद्धची कारवाई सुरूच असून, सोमवारी पोलिसांनी कारवाई करताना १० हजार रुपयांचा गुटखा व १२ हजार रुपये किमतीची मोटर सायकल असा एकूण २२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले.
अकोटात पकडला १० हजारांचा गुटखा
ठळक मुद्देमोटारसायकलवरून महाराष्ट्र सरकार ने प्रतिबंधित केलेला गुटखा व पान मसाला वाहून नेत असल्याचे आढळून आले.अंदाजे १० हजार रुपये किमतीचा गुटखा व पान मसाला व १२ हजार रुपये किमतीची मोटर सायकल असा एकूण २२ हजाररुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.