शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

 पालकमंत्र्यांनी केली डवरणी; बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी साधला संवाद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 14:22 IST

अकोला: जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ या मोहिमेच्या पहिल्या दिवशी शनिवारी अकोला तालुक्यातील डोंगरगाव व सिसा-मासा या दोन गावांत शेताच्या बांधावर जाऊन, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला व शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्या समजून घेतल्या.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ मोहीम ३० जूनपासून राबविण्यात येत आहे.शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला व शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या.शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्यां विविध योजनांची माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली.

अकोला: जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ या मोहिमेच्या पहिल्या दिवशी शनिवारी अकोला तालुक्यातील डोंगरगाव व सिसा-मासा या दोन गावांत शेताच्या बांधावर जाऊन, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला व शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्या समजून घेतल्या. त्यामध्ये डोंगरगाव येथील एका शेतात पालकमंत्र्यांनी डवरणीही केली.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ मोहीम ३० जूनपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे व संबंधित अधिकाऱ्यांनी अकोला तालुक्यातील डोंगरगाव व सिसा-मासा येथे भेट देली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला व शेतकऱ्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. त्यामध्ये डोंगरगाव येथील मधुकर महादेव देवकर यांच्या शेतात डवरणी सुरू असताना पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी डवरणीही केली. यावेळी शेतकरी मधुकर महादेव देवकर, श्रीकृष्ण नामदेव देवकर तसेच शेतमजूर नंदू भटकर यांच्याशी चर्चा करून पालकमंत्र्यांनी अडचणी समजून घेतल्या. डोंगरगाव येथे शेतात विद्युत खांब वाकले असून, तार तुटल्याची तक्रार शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. त्यानुषंगाने पालकमंत्र्यांनी वीज वितरण विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांसोबत संंपर्क साधून विद्युत खांब दुरुस्तीचे निर्देश दिले. तसेच पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्याची मागणी शेतमजुरांनी पालकमंत्र्यांकडे केली. यावेळी अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्री, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांच्यासह संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.पीक विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा करू नका - शेतकऱ्यांची मागणी!डोंगरगाव व सिसा-मासा येथे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यामध्ये पीक विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा करण्यात येत असल्याची समस्या शेतकऱ्यांनी पालमंत्र्यांसमोर मांडत, पीक विम्याचे पैसे कर्ज खात्यात जमा न करता बचत खात्यात जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्यां विविध योजनांची माहिती पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांसोबत केले भोजन!डोंगरगाव येथे एका शेतात डवरणी केल्यानंतर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शेतात शेतकऱ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला. शेतकऱ्यांसोबत भोजन करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

कृषी विद्यापीठातील शेततळे, वाशिंबा येथील उद्यानाची पाहणी!शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यापूर्वी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील शेततळ्यांमध्ये उपलब्ध झालेल्या पाणीसाठ्याची पाहणी केली. तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या वाशिंबा येथील उद्यानालाही भेट देऊन पाहणी केली.

 

टॅग्स :Akolaअकोलाguardian ministerपालक मंत्रीAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयFarmerशेतकरी