शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

'इको फ्रेन्डली ' होळीसाठी हरित सेनेचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:02 IST

पाणी बचत आणि नैसर्गिक रंगाचा वापर यावर भर देण्यात येणार आहे.

- सोहम घाडगे लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : होळीचा सण जवळ आला असून इको फ्रेन्डली होळीसाठी हरित सेनेने पुढाकार घेतला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील २३५ शाळांमधील हरित सेनेकडून राज्यभर जागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे. सोबतच पाणी बचत आणि नैसर्गिक रंगाचा वापर यावर भर देण्यात येणार आहे.होळीत नैसर्गिक रंगाचा वापर करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने राज्यभर जनजागृती करण्यात येते. त्यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करुन प्रबोधन करण्यात येते. यावर्षीही जिल्ह्यातील शाळांमध्ये हे उपक्रम राबविण्यात येत असून त्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. जानेफळ येथील सरस्वती विद्यालयाचे राष्ट्रीय हरित सेना प्रमुख प्रा. डॉ. नंदकिशोर बोकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध उपक्रम राबवित्आहेत. नैसर्गिक रंग बनविण्यासाठी विद्यार्थी कामाला लागले आहेत.उपलब्ध विविध प्रकारच्या फुलांपासून ओले व कोरडे रंग बनविले जाणार आहेत. परिसरातील कचरा जमा करुन कचऱ्याची होळी जाळणे, होळीत एरंडाचा वृक्ष न जाळता पर्यावरण बचावचा संदेश देण्यात येणार आहे.

बचतगटाची घेणार मदतनैसर्गिक रंगांची विक्री करण्यासाठी बचतगटाची मदत घेण्यात येणार आहे. मागच्या वर्षी बचत गटाच्या नलिनी वानखेडे यांच्या नेतृत्वात बुलडाणा येथे सहा स्टॉल लावण्यात आले होते. तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी स्टॉलला भेट दिली होती. अधिकाऱ्यांसह अनेक मान्यवरांनी स्टॉलवरुन नैसर्गिक रंग खरेदी केले होते.

असे बनवा नैसर्गिक रंगनैसर्गिक रंगांपासून शरिराला कुठलेच अपाय होत नाहीत. पळसाच्या फुलापासून लाल रंग बनविण्यात बनविला जातो. हळदमध्ये अरारुट पावडर मिसळून पिवळा रंग तयार होतो. बीटपासून जांभळा रंग तर कडूलिंबाचा पाला व पालक एकत्र करुन हिरवा रंग मिळतो. नागरिकांनी नैसर्गिक रंग बनवून त्याचा वापर करावा.

पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांनी पाण्याची बचत करुन नैसर्गिक रंगाद्वारे होळी खेळावी. बचत गटाच्या स्टॉलवर नैसर्गिक रंग विक्रीस ठेवण्यात येणार आहे.- संजय पार्डीकरविभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाHoliहोळीenvironmentपर्यावरण