शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचे चित्र धूसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 00:35 IST

अकोला : विदर्भातील शेतकरी परतीच्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत, पण कृषी हवामान शास्त्रानुसार परतीच्या पावसाचे चित्र धूसर सांगण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी अकोला शहर व लगतच्या भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

ठळक मुद्देतुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटांची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भातील शेतकरी परतीच्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत, पण कृषी हवामान शास्त्रानुसार परतीच्या पावसाचे चित्र धूसर सांगण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी अकोला शहर व लगतच्या भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, येत्या २४ तासांत तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट होण्याची शक्यता नागपूर वेधशाळेने वर्तविली आहे.   विदर्भात कमी पाऊस झाल्याने धरणात कमी जलसाठा आहे. पश्‍चिम विदर्भातील सर्व लघू, मध्यम व मोठे धरण मिळून ५0.११ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला शहराची तहान भागविणार्‍या काटेपूर्णा धरणात २0.९४  टक्केच जलसाठा आहे. त्यामुळे अकोलेकरांवर जलसंकट उभे ठाकले आहे. म्हणूनच यावर्षी शेतकर्‍यांसह नागरिकांना परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, मागील २४ तासांत विदर्भातील अकोल्यासह अमरावती येथे ११ मि.मी.,चंद्रपूर १.0 मि.मी., नागपूर येथे ४.३ मि.मी., तर वर्धा येथे 0.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.     दरम्यान, तापमानात वाढ होत असून, अकोल्याचे कमाल तापमान ३६.५ अंश होते. बुलडाणा ३३, ब्रम्हपुरी ३५, चंद्रपूर ३३.५, वर्धा ३४.५, तर यवतमाळचे तापमान ३२.0 डिग्री सेल्सिअस एवढे होते.

 विदर्भातील पावसासाठीचे वातावरण मोकळे होत असून, परतीच्या पावसाचे चित्र धूसर आहे. डॉ.आर.एन. साबळे,ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ, पुणे.

टॅग्स :Rainपाऊस