शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

‘एमटीडीसी’कडे २१९ कोटींचे अनुदान पडून

By admin | Updated: April 11, 2017 21:39 IST

केंद्र आणि राज्य सरकारने दिलेले २१९ कोटींचे अनुदान राज्य अकोला- पर्यटन विकास महामंडळाकडे (एमटीडीसी)पडून असल्याचा परिणाम पर्यटनावर झाल्याचे ‘कॅग’ने अहवालात नमूद केले आहे.

पर्यटनाला खो; ‘कॅग’चा अहवालअकोला: राज्यात पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने दिलेले २१९ कोटींचे अनुदान राज्य पर्यटन विकास महामंडळाकडे (एमटीडीसी)पडून असल्याचा परिणाम पर्यटनावर झाल्याचे ‘कॅग’ने अहवालात नमूद केले आहे. पर्यटकांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात ‘एमटीडीसी’ची कार्यप्रणाली अपयशी ठरल्यामुळे पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याचे चित्र आहे.राज्यात पर्यटनाला मोठा वाव असून, विविध भागात घनदाट जंगल आहेत. या व्यतिरिक्त राज्याच्या कानाकोपऱ्यात थंड हवेच्या ठिकाणांची संख्या जास्त असून तीर्थस्थळे, पुरातन लेणी, कोकण किनारपट्टीसह मुंबई किनारपट्टी लाभली आहे. बाराही महिने साजरे होणारे सण, कला संस्कृती अशा विविधतेने नटलेल्या राज्यात पर्यटन वाढीसाठी पर्यटन विकास महामंडळाने प्रयत्न करणे अपेक्षित आहे. राज्यात पर्यटनवाढीला पोषक स्थिती असताना पर्यटकांना आकर्षित करण्यात एमटीडीसी अपयशी ठरल्याचे ‘कॅग’ने अहवालात नमूद केले आहे. एमटीडीसीच्या अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, केंद्र व राज्य सरकारकडून प्राप्त २१९ कोटींचे अनुदान अखर्चित राहिले आहे. महामंडळाच्या कारभारामुळे पर्यटन व्यवसायात गोवा, गुजरात राज्यांनी महाराष्ट्राला पिछाडीवर टाकले आहे. पर्यटकांच्या संख्येत घटघनदाट जंगले, थंड हवेची ठिकाणे, किल्ले, समुद्र किनारे, तीर्थस्थाने अशा विविधतेने नटलेल्या महाराष्ट्रात पर्यटकांना सोयी-सुविधा देण्यात एमटीडीसीची यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. राज्यात पर्यटकांचे प्रमाण ११.१३ असून गुजरातमध्ये १७.६८ तर गोव्यात ३२.५० आहे.चिखलदऱ्यात १७ कोटींची उधळपट्टीविदर्भासह राज्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या चिखलदरा येथे दरवर्षी पर्यटकांची मोठी संख्या राहते. या ठिकाणी एमटीडीसीने भाडेतत्त्वावर पर्यटन संकुल दिले असले तरी पर्यटकांसाठी ते तातडीने उपलब्ध होत नाही. शिवाय संबंधित कंत्राटदारास नियमबाह्यपणे १७ कोटी ३६ लाखांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याचे अहवालात ‘कॅग’ने नमूद केले आहे.