शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 18:22 IST

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन केले जात आहे.

अकोला : राज्यातील २२००० ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांवर शासनाकडून कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने ९ आॅगस्टपासून असहकार आंदोलन केले जात आहे. १३ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन, त्याबाबतचे निवेदन ग्रामसेवक युनियनच्या राज्य तसेच जिल्हा शाखा पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिले.गावपातळीवर समकक्ष काम करणारे राज्य कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ग्रामसेवकांना प्रचंड काम असताना इतरांना सेवाविषयक बाबी कमी असताना वेतनात असमानता, पदोन्नती संधी नाही. शासनाने ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांचा विचार न केल्याने आंदोलन केले जात आहे. त्यामध्ये समान काम-समान दाम, समकक्ष पदे-समान वेतनश्रेणी, ग्रामसेवकाच्या शैक्षणिक अर्हता बदल करणे, लोकसंख्या आधारित ग्रामविकास अधिकारी पदांत वाढ करणे, वेतनत्रुटी दूर करणे, २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेंशन योजना लागू करणे, आदर्श ग्रामसेवकांना आगाऊ एक वेतनवाढ देणे, ग्रामसेवक युनियनचे महाअधिवेशन घेणे, अतिरिक्त कामे कमी करणे, या मागण्यांचा समावेश आहे. त्या मंजूर होण्यासाठी असहकार आंदोलन केले जात आहे. त्यानंतर आता १६ आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन, १८ आॅगस्ट रोजी पालकमंत्री यांच्या घरासमोर आंदोलन, २४ आॅगस्ट रोजी ग्रामविकास मंत्री, प्रधान सचिव यांच्या निवासस्थानासमोर राज्याचे पदाधिकारी एक दिवस उपोषण करतील. २२ आॅगस्ट रोजी असहकार आंदोलन समाप्त करून काम बंद आंदोलन सुरू होणार आहे. त्यासाठी सर्वच ग्रामसेवक ग्रामपंचायतीच्या चाव्या पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांकडे देणार आहेत. याबाबतचा इशाराही निवेदनात देण्यात आला. यावेळी ग्रामसेवक युनियनचे विभागीय सहसचिव शेख चांद कुरेशी, डॉ. उल्हास मोकळकर, जिल्हाध्यक्ष रवीबाबू काटे, बाळासाहेब बोचरे, निमकर्डे, रोहिदास भोयर, संजय गावंडे, विनोद सोनवणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदagitationआंदोलन