बाशीर्टाकळी (जि. अकोला): तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थांनी ७ एप्रिलच्या मध्यरात्रीपासूनच श्रमदानास प्रारंभ करून जलसंधारणाची मोहिम आणखी तिव्र केली आहे. निमित्त आहे पाणी फाउंडेशनच्या वाटर कप स्पर्धेचे. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या ग्रामस्थांनी श्रमदानाचा संकल्प केला आहे. तालुक्यात ८ एप्रिल रोजी शेकोडो नागरिकांनी श्रमदानातून नाला खोलीकरण ,शोष खड्डे तयार करणे सुरु केले आहेत. अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वाटर कप स्पर्धेला ८ एप्रिल रोजी सुरूवात झाली. ही स्पर्धा ४५ दिवस चालणार आहे. यामध्ये सहभागी गावाने जास्तीस जास्त जलसंधारणचे काम करावे ,पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब हा आपल्या गाव क्षेत्रात मुरवण्यासाठी ग्रामस्थ धडपड करीत आहेत. यातूनच कान्हेरी सरप येथील शेकोडो महिला पुरूषांनी गावा शेजारी असलेल्या नाल्यातील गाळ काढण्यासाठी सकाळी६.३0वाजतापासून श्रमदान केले. लहानांपासून तर युवक वृद्धा पयर्ंत सर्वांनी यामध्ये उत्साहात भाग घेतला. कान्हेरी सरप मध्ये दिवस रात्र गावकरी श्रमदान करत आहे. यामध्ये गावातील युवकांनी बचतीचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना पानी फाऊंडेशन च्या तालुका समन्वयक समाधान वानखडे ,संघापाल वाहुवाघ यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तांत्रिक मार्गदर्शन पवन मिश्रा,चंद्रभान पाटील हे करत आहेत. गावकर्यांच्या श्रमदानाला प्रशासकीय अधिकारी ,तहसीलदार राजेंद्र जाधव , नायब तहसीदार अतुल पाटोळे ,गटविकास अधिकारी गाठेकर ,पंचायतचे चव्हाण यांनी भेट दिली.
जलसंधारणासाठी सरसावले ग्रामस्थ
By admin | Updated: April 8, 2017 17:44 IST