शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

महाबीज राज्यात ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:02 IST

महाराराष्ट्र  राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) मागील वर्षी हा कार्यक्रम यशस्वी राबविल्यानंतर यावर्षी सोयाबीन व भात बियाण्यांच्या निर्मितीसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहाबीजने मागील वर्षी रब्बी व उन्हाळी हंगामात भुईमूग, गहू व हरभरा पिकांचा राज्यातील १६ हजार ६०० गावांत ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविला. हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर यावर्षी धान व सोयाबीनमध्ये हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. यासाठी महाबीजने ६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करू न केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता.

- राजरत्न सिरसाट

अकोला : शेतकऱ्यांना शुद्ध बियाणे उपलब्ध होऊन दर्जेदार उत्पादनासाठी राज्यात ग्राम बीजोत्पादनावर भर दिला जात असून, महाराराष्ट्र  राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) मागील वर्षी हा कार्यक्रम यशस्वी राबविल्यानंतर यावर्षी सोयाबीन व भात बियाण्यांच्या निर्मितीसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याकरिता ६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच प्रस्ताव मंजूर होणार असल्याचे वृत्त आहे.शेतकºयांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होत नसल्याने अनेक वेळा बियाणे न उगवण्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसानही होत आहे. यातून शेतकºयांची सुटका होऊन दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यासाठी महाबीजने मागील वर्षी रब्बी व उन्हाळी हंगामात भुईमूग, गहू व हरभरा पिकांचा राज्यातील १६ हजार ६०० गावांत ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविला. यात तीन लाख शेतकºयांनी सहभाग घेतला होता. त्यासाठी ३० कोटी रुपये अनुदान दिले आहे. हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर यावर्षी धान व सोयाबीनमध्ये हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. यासाठी महाबीजने ६५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करू न केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे वृत्त आहे. मागील वर्षी दहा हजार ५५९ क्विंटल  बियाणे शेतकºयांना अनुदानावर वाटप करण्यात आले होते. यावर्षी भात व सोयाबीन बियाण्यात वाढ करण्यात येणार आहे. यासाठी मिळणाºया अनुदानामध्ये केंद्र सरकारचा ६० टक्के, तर राज्य शासनाचा वाटा ४० टक्के आहे. 

शुद्ध व दर्जेदार बियाणे उत्पादनासाठी राज्यात ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत असून, यावर्षी सोयाबीन व भात पिकाचा ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे.- ओमप्रकाश देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाMahabeejमहाबीजFarmerशेतकरी