अकोला : यावर्षी केंद्र शासनाने हरभºयाला (चना)चार हजार रू पये प्रति ´क्विंटल हमीदर जाहीर केले,यावर राज्य शासनाने ४०० रू पये प्रति ´क्विंटल बोनस देणार आहे. पण काढणीपुर्वीच बाजारात दर कोसळले. शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसले तरी या खरेदी केंद्रावर प्रतवारी व आर्द्रतेचे निकष लावले जात असल्याने शेतकऱ्यां ना बाजारातच हरभरा विकाला लागतो हे प्रत्येकवर्षाचे उदाहरण असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.पश्चिम विदर्भात रब्बी हंगामात बिगर सिंचनाचा हरभरा मोठ्याप्रमाणात घेतला जातो.यावर्षी अकोला, बुलडाणा, वाशिम,यवतमाळ व अमरावती जिल्हयात ४ लाख २३ हजार ९२० हेक्टर १२४ टक्के हरभºयाची पेरणी झाली.मागच्यावर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र ५० हजार हेक्टरने कमी असले तरी यावर्षी प्रतिकुल परिस्थितीत शेतकºयांनी हरभºयाची पेरणी केली. खरीपातील जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकºयांची भिस्त हरभरा पिकवर आहे शेतकºयांना पैशाची निंतात गरज असल्याने हरभरा विक्रीची घाई सुरू आहे.पण काढणीच्या अगोदरच बाजारभाव कोसळले.अकोला कृषी उत्पन्न बाजारात आजमितीस सरासरी ६००´क्विंटल आवक सुरू आहे. शुक्रवारी ६२२ ´क्विंटल आवक झाली,या शेतकऱ्यांना येथे प्रति क्विंटल सरासरी दर ३,४२५ रू पये मिळाले तर प्रतवारीचे कमीत कमी दर ३,१०० रू पये होते, चांगल्या वाळलेल्या पिवळ््या हरभºयाला ३,७५० रू पये दर देण्यात आले.- आयात केलेला १२ ते १३ लाख ´क्विंटल हरभरा भारताच्या बंदरावर पडलेला असून, सद्या सर्वच डाळवर्गीय पिकांचे दर कमी आहेत.तसेच डाळ गीरणी व बाजारातही हरभरा उपलब्ध असल्याने दर कमी आहेत.- बसंत बाछुका,उद्योजक,अकोला.
काढणीपुर्वीच बाजारात हरभऱ्याचे दर कोसळले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 18:54 IST
अकोला : यावर्षी केंद्र शासनाने हरभºयाला (चना)चार हजार रू पये प्रति ´क्विंटल हमीदर जाहीर केले,यावर राज्य शासनाने ४०० रू पये प्रति ´क्विंटल बोनस देणार आहे. पण काढणीपुर्वीच बाजारात दर कोसळले.
काढणीपुर्वीच बाजारात हरभऱ्याचे दर कोसळले !
ठळक मुद्देबुलडाणा, वाशिम,यवतमाळ व अमरावती जिल्हयात ४ लाख २३ हजार ९२० हेक्टर १२४ टक्के हरभऱ्याची पेरणी झाली.अकोला कृषी उत्पन्न बाजारात आजमितीस सरासरी ६००´क्विंटल आवक सुरू आहे. तसेच डाळ गीरणी व बाजारातही हरभरा उपलब्ध असल्याने दर कमी आहेत.