लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला तालुक्यातील एकलारा व काटी-पाटी या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये काटी-पाटी ग्रामपंचायतसाठी ८२ टक्के, तर एकलारा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९१ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सीलबंद झाले. मतमोजणी बुधवारी अकोला तहसील कार्यालयातील सभागृहात होणार असून, त्यामध्ये उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. जानेवारी व फेब्रुवारी २0१८ मध्ये पाच वर्षांची मुदत संपणार्या अकोला तालुक्यातील एकलारा आणि काटी या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २६ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये एकलारा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९१.२0 टक्के, तर काटी-पाटी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८२.१0 टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रियेत एकलारा ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी तीन तर सदस्य पदांसाठी १0 आणि काटी-पाटी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी नऊ व सदस्य पदांसाठी पाच उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये सीलबंद झाले. या निवडणुकीची मतमोजणी बुधवार, २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून अकोला तहसील कार्यालयातील सभागृहात सुरू होणार असून, मतमोजणीत उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूक : अकोला तालुक्यातील काटी-पाटी ८२ टक्के, तर एकलारा ९१ टक्के मतदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:50 IST
अकोला : अकोला तालुक्यातील एकलारा व काटी या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये काटी-पाटी ग्रामपंचायतसाठी ८२ टक्के, तर एकलारा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९१ टक्के मतदान झाले.
ग्रामपंचायत निवडणूक : अकोला तालुक्यातील काटी-पाटी ८२ टक्के, तर एकलारा ९१ टक्के मतदान!
ठळक मुद्देउमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’बुधवार, २७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार मतमोजणी