ग्रामपंचायत निवडणुक इच्छुक उमेदवाराची कागदपत्रासाठी दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 07:53 PM2017-09-15T19:53:15+5:302017-09-15T19:53:43+5:30

मानोरा : ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला. नामनिर्देशन दाखल करण्यासही १५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली.  त्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करण्यासाठी इच्छुक उमेदवाराची कमालीची दमछाक होत असल्याचे पहावयास मिळत आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या आधल्या दिवशी तर तहसीलला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.

Gram Panchayat: Precarious for documentary candidates for election campaign | ग्रामपंचायत निवडणुक इच्छुक उमेदवाराची कागदपत्रासाठी दमछाक

ग्रामपंचायत निवडणुक इच्छुक उमेदवाराची कागदपत्रासाठी दमछाक

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर १५ सप्टेंबरपासून नामनिर्देशन दाखल करण्यास प्रारंभनामनिर्देश्नाकरीता लागणारे कागदपत्र गोळा करण्यासाठी तहसीलमध्ये गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला. नामनिर्देशन दाखल करण्यासही १५ सप्टेंबरपासून सुरुवात झाली.  त्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार करण्यासाठी इच्छुक उमेदवाराची कमालीची दमछाक होत असल्याचे पहावयास मिळत आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या आधल्या दिवशी तर तहसीलला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
मानोरा तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला.१५ ते २२ सप्टेबर दरम्यान नामनिर्देशन दाखल करावयाचे आहे. त्यासाठी राखीव  जागेवर अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक असलेल्या जात पडताळणी प्रस्तावासाठी इच्छुक उमेदवाराची कमालीची धावपळ होत आहे. अनेक ठिकाणी  महिला राज असल्यामुळे आवश्यक असलेल्या कोतवाल बुकाची नक्कलसाठी धावपळ पहावयास मिळत आहे. अनेक महिला उमेदवारांचे माहेर तालुक्याबाहेरील असल्यामुळे कोतवाल बुकाची नक्कल काढण्यासाठी गावपुढारी यांची प्रतिष्ठा पणाला लागत आहे. सरपंच पदासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहे. सर्वसाधारण असलेल्या जागेवर अनेक उमेदवारांनी नागरिकांचा संपर्क वाढवला आहे. तर राखीव असलेल्या जागेवर अनेक गावातुन सरपंच पदाचा उमेदवार अविरोध देण्यासाठी हालचाली सुरु आहे.

Web Title: Gram Panchayat: Precarious for documentary candidates for election campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.