शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

जूनमध्ये धान्य, रॉकेल वाटप बंद ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 3:54 PM

१ जूनपासून दुकानांतून धान्य वाटप बंद केले जाईल, तसेच केरोसिन विक्रीही बंद केली जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

अकोला : राज्यातील रास्त भाव दुकानदार, केरोसिन विक्रेत्यांच्या विविध मागण्या ३१ मे पर्यंत पूर्ण न झाल्यास येत्या १ जूनपासून दुकानांतून धान्य व केरोसिन वाटप बंद ठेवण्यात येत आहे, असे निवेदन राज्याच्या पुरवठा मंत्र्यांना विदर्भ रास्त भाव दुकानदार, केरोसिन विक्रेता संघटनेने दिले आहे.संघटनेने पाठवलेल्या निवेदनात दुकानदारांना तामिळनाडू सरकारप्रमाणे मानधन द्यावे, संपूर्ण राज्यात इ-पॉस मशिन योग्य चालत नाही. त्यामुळे धान्य वाटपात अडथळा येतो त्याचा शिधापत्रिकाधारक, दुकानदारांनाही त्रास होतो, तो थांबवण्यात यावा, ३१ मे पर्यंत दुकानदारांचा अंगठा लावून धान्य निघते, तशी सुविधा कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत द्यावी, राज्यात पाच दुकानदारांनाचा कोरोेनामुळे मृत्यू झाला आहे. तर अनेक आजारी आहेत. त्यामुळे राज्यातील दुकानदारांना ५० लाखांचे विमा कवच द्यावे, राज्यातील शिधापत्रिकाधारकांना प्रती कार्डवर २ लिटर केरोसिन द्यावे, गावगुंड, अतिउत्साही समाजसेवक यांच्याकडून दुकानदारांना होणारी मारहाण, खोट्या तक्रारी थांबवण्यात याव्या, या सर्व मागण्यांवर शासनाने ३१ मे पर्यत निर्णय घ्यावा, तो न झाल्यास १ जूनपासून दुकानांतून धान्य वाटप बंद केले जाईल, तसेच केरोसिन विक्रीही बंद केली जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. त्यावर विदर्भ रास्त भाव दुकानदार, केरोसिन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, ज्येष्ठ उपाध्यक्ष शत्रुघ्न मुंडे, भगवंत राऊत, सचिव यादव पाटील, संजय देशमुख, सुरेश लालवाणी, ओमप्रकाश खानतराटे, कैलाश महाजन, राजेश कांबळे, पंडितराव देशमुख यांच्या स्वाक्षरी आहेत.

 

टॅग्स :Akolaअकोला