शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भाषा व गणितात १ लाख ३३ हजार विद्यार्थ्यांना ए ग्रेड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 13:45 IST

जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयामध्ये ए ग्रेड प्राप्त केला तर १ लाख ७४ हजार ६२४ विद्यार्थ्यांना बी ग्रेड प्राप्त केला आहे.

अकोला: प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिकणारे विद्यार्थी १00 टक्के प्रगत झाले पाहिजेत, या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत कृती कार्यक्रम चार टप्प्यांमध्ये राबविण्यात आला. चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील ९७५ प्राथमिक शाळांचा अध्ययन स्तर उंचावला आहे. ३ लाख ६७ हजार ५५ विद्यार्थ्यांनी संकलित चाचणी दिली होती. यात जिल्ह्यातील १ लाख ३३ हजार ४७२ विद्यार्थ्यांनी भाषा व गणित विषयामध्ये ए ग्रेड प्राप्त केला तर १ लाख ७४ हजार ६२४ विद्यार्थ्यांना बी ग्रेड प्राप्त केला आहे.जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव, समाधान डुकरे, सागर तुपे, तेजस्विनी आळवेकर, डॉ. राम सोनारे, डॉ. विकास गावंडे, कविता बोरसे, डॉ. जितेंद्र काठोळे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा भाषा व गणित विषयातील अध्ययन स्तर ठरविण्यासाठी चार टप्प्यात इयत्ता पहिली ते पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कृती कार्यक्रमादरम्यान सात तालुके व एक मनपा क्षेत्रातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर गटशिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय साधन व्यक्ती यांनी निश्चित केला, तसेच जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांनीसुद्धा प्रत्येकी एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयाचा अध्ययन स्तर निश्चित करून त्याचा अहवाल तयार केला. जिल्ह्यातील ९७५ शाळांमधील विद्यार्थ्यांचा भाषेमध्ये ५४.७८ टक्क्यावरून ६५.७३ टक्क्यांवर अध्ययन स्तर उंचावला तर गणित विषयातील वजाबाकीमध्ये ५७.९६ टक्क्यांवरून ६७.९८ टक्के, भागामध्ये ५९.९६ टक्क्यांवरून ६९.५८ टक्क्यांपर्यंत अध्ययन स्तर उंचावला आहे. संकलित चाचणीदरम्यान विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावत असल्याचे दिसून येत आहे. भाषेमध्ये ६६ हजार ४९८ तर गणितात ६१,९७४ विद्यार्थ्यांनी ८१-१00 टक्केपर्यंतचे गुण प्राप्त केले आहेत. (प्रतिनिधी)ग्रेडनुसार विद्यार्थी संख्याए ग्रेड ८१-१00 टक्के- ६६४९८ (भाषा)- ६१९७४ (गणित)बी ग्रेड ६१-८0 टक्के- ८६३४५- ८८२७९सी ग्रेड ४१-६0 टक्के- २२३0१- २४0४६डी ग्रेड 0-४0 टक्के- ५१६५- ६९६५

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणStudentविद्यार्थी