शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आता १ फेब्रुवारीपासून शासकीय तूर खरेदी सुरू  होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 01:38 IST

अकोला : येत्या १ फेब्रुवारीपासून शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू  होणार असून, एकरी दोन ऐवजी आता तीन  क्विंटल तूर खरेदी केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी यासंबंधीचे आदेश दिले आहेत .

ठळक मुद्देएकरी तीन क्विंटल तूर खरेदी करणार!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : येत्या १ फेब्रुवारीपासून शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू  होणार असून, एकरी दोन ऐवजी आता तीन  क्विंटल तूर खरेदी केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी यासंबंधीचे आदेश दिले आहेत .राज्यात सोयाबीन, मूग अशा द्विदल पिकासोबत तूर आंतर पीक पेरणी केली जात असून, कृषी विभागाच्यावतीने या पिकाची हेक्टरी उत्पादकता काढून सहकारी खरेदी-विक्री संघाला कळविण्यात येत असते. खरेदी केंद्रावर तूर विक्रीला आणण्यापूर्वी तलाठय़ाकडून  सात- बारा उतार्‍यावर दोन्ही पिकांच्या क्षेत्राची नोंद केल्या जाते; पण ही नोंद अध्र्या-अध्र्या क्षेत्राची केली जात असल्याने, खरेदी-विक्री संघाकडून पिकाच्या उत्पादनाची नोंद घेताना अर्धेच क्षेत्र गृहित धरण्यात येते. प्रत्यक्षात तूर ही सर्व क्षेत्रावर असते.दरम्यान, सोयाबीन पिकाचा काढणी हंगाम नोव्हेंबरपर्यंत असतो. त्यानंतर जानेवारी शेवटच्या आठवड्यापासून सोयाबीनमध्ये असलेल्या तूर या आंतर पिकाचा काढणी हंगाम सुरू  होतो. तूर पिकाचा विस्तार  मोठा असल्याने, हे पीक पूर्ण क्षेत्रावर विस्तारलेले असते. विशेष म्हणजे तूर पिकाच्या एकल पेरणी दरम्यानसुद्धा दोन ओळींमधील अंतर सारखेच असते, त्यामुळे  तूर पिकाचे क्षेत्र अर्धे गृहित न धरता पूर्ण धरूनच तूर उत्पादनाची नोंद घ्यावी. आतापर्यंत  तसे होत नसल्याने शेतकर्‍यांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये शासनाप्रती नाराजीचा सूर आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी पूर्ण क्षेत्राची नोंद घेण्याचे आदेशही दिले आहेत.

तूर खरेदीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा खरीप हंगामातील तूर काढणीचा हंगाम सुरू  आहे; परंतु शासकीय तूर खरेदी केंद्र सरू  न केल्याने अकोल्याचे आमदार रणधिर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी भेट घेऊन याविषयी चर्चा केली. तूर (आंतर पिकासाठी) उत्पादनाची नोंद  करताना अध्र्या क्षेत्रा ऐवजी पूर्ण क्षेत्र गृहित धरूनच तूर उत्पादनाची नोंद घ्यावी. शेतकर्‍यांनी प्रत्यक्ष पिकविलेला माल खरेदी केंद्रांवरून परत जाऊ नये, याकरिता सर्व संबंधित विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना तातडीने तसे आदेश निर्गमित करण्याबाबत  मुख्यमंत्री यांनी कृषी व पणन खात्याचे प्रधान सचिव विजय कुमार यांना चर्चे दरम्यान सूचना दिल्या. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMarket Yardमार्केट यार्ड