शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शासकीस कापूस खरेदी २७ नोव्हेंबरला सुरू होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 11:03 IST

खरेदी केंद्रे सुरू केले नसल्याने शेतकºयांना खासगी बाजारात कापूस विकून नुकसान सहन करावे लागत आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला : परतीच्या पावसाने कापसाची प्रत घसरली असून, उताराही घटल्याने खासगी बाजारात कापसाचे दर कमी झाले आहेत. शेतकऱ्यांची होणारी ही आर्थिक पिळवणूक बघता, महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने २७ नोव्हेंबरपासून शासकीय कापूस खरेदी केंदे्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.यावर्षी कपाशीची पेरणी राज्यात ४२ लाख हेक्टरवर झाली आहे; परंतु सतत व परतीच्या पावसाने खरीप हंगामातील कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मान्सूनपूर्व कपाशीची काही ठिकाणी वेचणी करण्यात आली. बाजारात अत्यंत कमी दराने कापूस खरेदी करण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात सप्टेंबर महिन्यातच खासगी कपाशी खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. सुरुवातीला या केंद्रांवर प्रतिक्ंिवटल ५ हजार ६०० रुपये दर देण्यात आले.परंतु कापूस भिजल्याने व्यापाºयांनी दर कमी केले असून, आजमितीस हे दर प्रतिक्ंिवटल ३,८०० ते ४,८०० रुपयांपर्यंत घटले आहेत. केंद्र शासनाने यावर्षी धाग्याच्या लांबीनुसार कपाशीची आधारभूत किंमत ठरविली असून, आखूड धाग्याच्या कपाशीचे प्रतिक्ंिवटल ५,२५५ तर लांब धाग्याच्या कपाशीला ५,५५० रुपये दर जाहीर केले आहेत; परंतु खरेदी केंद्रे सुरू केले नसल्याने शेतकºयांना खासगी बाजारात कापूस विकून नुकसान सहन करावे लागत आहे.या पृष्ठभूमीवर पणन महासंघाचे अध्यक्ष व संचालकांनी गुरुवारी मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक व पणन सचिवांची भेट घेतली व कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. यानंतर शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय पणन महासंघाने घेतला असून, राज्यात ४५ खरेदी केंदे्र टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. शेतकºयांनी मात्र कापूस वाळवून आणावा, १२ टक्क्याच्यावर आर्द्रता नसावी, ८ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असल्यास ५५ रुपये किलोप्रमाणे त्यात कपात करण्यात येणार असल्याचे पणन महासंघाने जाहीर केले आहे.

 २७ नोव्हेंबरपासून राज्यात ४५ शासकीय कापूस खरेदी केंद्र टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. शेतकºयांनी कापूस वाळवून आणावा, १२ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेला कापूस खरेदी करण्यात येणार आहे. ८ ८ टक्क्यांपर्यंत आर्द्रता असल्यास ५५ रुपये किलोप्रमाणे त्यात कपात करण्यात येणार आहे.- राजूभाऊ देशमुख,अध्यक्ष, महाराष्टÑ राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ.

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस