शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोवर्धन हरमकार मृत्यू प्रकरण: अखेर पाच पोलिस कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदली, पोलिस उपनिरीक्षकासह कर्मचारी कारागृहात

By नितिन गव्हाळे | Updated: May 13, 2024 00:39 IST

अकोट पोलीस स्टेशन अंतर्गत मोबाईल चोरीच्या प्रकरणात गोवर्धन हरमकार याला ताब्यात घेतल्यानंतर या युवकाला पोलिसांनी मारहाण केल्याने, त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटूंबियांनी केला आहे. 

जिल्ह्यातील अकोट पोलीस स्टेशनमध्ये गोवर्धन हरमकार या संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणात अखेर पाच पोलिसांनापोलिस मुख्यालयात अटॅच करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शनिवार ११ मे रोजी अकोट शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार तपन कोल्हे यांचीही बदली मुख्यालयात करण्यात आली आहे. अकोट पोलीस स्टेशन अंतर्गत मोबाईल चोरीच्या प्रकरणात गोवर्धन हरमकार याला ताब्यात घेतल्यानंतर या युवकाला पोलिसांनी मारहाण केल्याने, त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटूंबियांनी केला आहे. 

मृतकांच्या कुटूंबियांनी अकोट शहर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आतापर्यंत पीएसआय राजेश जवरे आणि पोलिस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळुंके अकोट पोलीस ठाण्यातील मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, प्रेमानंद पचांगे आणि रवि सदाशिव यांच्याविरूद्ध खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या पोलिस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि पोलीस कर्मचारी सोळुंके न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान याप्रकरणी गुन्हे दाखल झाल्यापासून उर्वरित पोलिस कर्मचारी बेपत्ता आहेत.

नेमके काय आहे, प्रकरण?मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकर यांच्या तक्रारीनुसार एका गुन्ह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे आणि इतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी १५ जानेवारी रोजी पुतण्या गोवर्धन याला अटक केली. त्यानंतर १६ जानेवारीला सुकळी गावात आणत घराची झडती घेतली. पुढे पोलिसांनी गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव यांनाही ताब्यात घेतले. १६ जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याठिकाणी दोघांनाही अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या मारहाणीत सुखदेव हरमकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने दोघांनी रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्था झालेल्या गोवर्धनला बाहेरील आकाश नामक व्यक्तीच्या मदतीने पोलिसांनी खासगी रुग्णालयात दाखल केले आणि १७ जानेवारीला गोवर्धनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस