शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 18:35 IST

अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी खिश्चन धर्मियांचा पवित्र सण गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.

अकोला: शहरासह अकोला जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शुक्रवारी खिश्चन धर्मियांचा पवित्र सण गुडफ्रायडे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. शहरातील दहा प्रार्थनास्थळांमध्ये (चर्च) यावेळी प्रार्थनासभांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त रविवारी खिश्चन धर्मीय ईस्टर संडे हा सण साजरा करणार आहेत.प्रभू येशू खिस्तांनी अखिल मानवजातीच्या पापक्षालनासाठी क्रूसखांबावर दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून जगभरात गुड फ्रायडे (उत्तम शुक्रवार) हा सण साजरा केला जातो. अकोल्यातही शुक्रवारी हा सण मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी शहर आणि जिल्ह्यातील सुमारे ३० चर्चेसमधून प्रार्थनासभांचे सकाळी आणि दुपारी आयोजन करण्यात आले. खदान खिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चमध्ये शुक्रवारी दुपारी १२ ते ३ या वेळात आयोजित प्रार्थनासभेमध्ये, प्रभू येशू खिस्तांनी क्रूसखांबावर लटकविण्यात आले असता उच्चारलेल्या सात वाक्यांवर बायबलच्या अभ्यासकांनी प्रकाश टाकला. यामध्ये प्रियंका वाळके, शीला खंडारे, मागार्रेट माघाडे, डॉ. शीतल ठाकूर, प्रिमला भिसे, मीनाक्षी वर्मा आणि रेव्हरंड निलेश अघमकर यांनी आपले विचार मांडले. याप्रसंगी संडेस्कूल, महिला संघ, तरुण संघाच्या सदस्यांनी गुडफ्रायडेवर आधारित गीते सादर केली. संचालन वैशाली डोंगरदिवे यांनी केले.गेल्या चाळीस दिवसांपासून खिश्चन धर्मियांचा पवित्र लेन्थ महिना सुरु होता. या चाळीस दिवसांच्या काळात खिश्चन बंधू-भगिनी उपवास आणि प्रार्थना करतात. घरोघरी कॉटेज प्रेअर्सचे आयोजन केले जाते. गुरुवारी मौंदी गुरुवारनिमित्त प्रार्थनासभा होते.प्रात:समयीची प्रार्थनादरम्यान, रविवारी प्रभू येशू खिस्तांच्या पुनरुत्थानानिमित्त जगभरात ईस्टर संडे हा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चच्या प्रांगणात शनिवारी रात्रीच एक मोठे रिंगण तयार करण्यात येते. रविवारी पहाटे सहा वाजता अकोल्यातील सर्वच चर्चचे सदस्य तेथे उपस्थित होऊन प्रात:कालच्या प्रार्थनासभेत सहभागी होतात. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता इंग्रजांच्या काळापासून अस्तित्वात असलेल्या अकोल्यातील एकमेव खिश्चन कॉलनीमधून दिंडी काढण्यात येऊन ईस्टर संडेनिमित्त विविध गीते गायली जातात. रविवारी जस्टीन मेश्रामकर, राजेश ठाकूर, अजय वर्मा, अमित ठाकूर, चंद्रकांत ढिलपे, सरला मेश्रामकर, अरविंद बिरपॉल, यांच्या नेतृत्वात ही दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाGood Friday 2018गुड फ्रायडे २०१८Indian Festivalsभारतीय सण