शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात अकोल्यातूनच जा गोव्याला, नागपूर-मडगाव एक्स्प्रेस जूनअखेरपर्यंत धावणार!

By atul.jaiswal | Updated: April 1, 2024 13:23 IST

विदर्भातून कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. 

अकोला : विदर्भातील प्रवाशांना गोव्याची वारी घडविणाऱ्या नागपूर-मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला मुदतवाढ देण्यात आली असून, अकोलामार्गे धावणारी ही गाडी आता ३० जून २०२४ पर्यंत चालविण्यात येणार आहे. या गाडीला अकोल्यात थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे. विदर्भातून कोकणात जाण्यासाठी थेट रेल्वेगाडी नसल्यामुळे अशा गाडीची वारंवार मागणी होत होती. 

गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन या मार्गावर विशेष गाड्यांचे नियोजन रेल्वेकडून करण्यात येते. दोन वर्षांपूर्वी दिवाळी व नाताळच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या नागपूर-मडगाव-नागपूर (०११३९/०११४०) या आठवड्यातून दोनदा धावणाऱ्या गाडीला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येत आहे. गाडीला मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन रेल्वेने आता ही गाडी २९ जून २०२४ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांच्या कालावधीत या विशेष गाडीच्या दोन्ही बाजूच्या मिळून ५४ फेऱ्या होणार आहेत.

...असे आहे वेळापत्रकसुधारित वेळापत्रकानुसार, नागपूर-मडगाव एक्स्प्रेस (०११३९) ही द्विसाप्ताहिक गाडी ३ एप्रिल ते २९ जून पर्यंत नागपूर स्थानकावरून दर बुधवार व शनिवारी दुपारी ३:०६ मिनिटांनी सुटून मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०५:४६ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगाव-नागपूर एक्स्प्रेस (०११४०) ही द्विसाप्ताहिक गाडी ४ एप्रिल ते ३० जून पर्यंत दर गुरुवार व रविवारी मडगाव स्थानकावरून रात्री ०८:०१ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०२१:३१ वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल.

कोणत्या स्थानकांवर थांबा?नागपूर जंक्शन ते मडगाव (गोवा) या प्रवासात ही गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवीम (गोवा) तसेच करमाळी (गोवा) या स्थानकांवर थांबणार आहे. 

टॅग्स :Akolaअकोलाrailwayरेल्वे