शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘निगरुणा’चे पाणी सिंचनासाठीच द्या; आलेगाववासियांची मागाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 20:55 IST

अलेगाव : निर्गुणा प्रकल्पाचे पाणी पारस वीज निर्मिती केंद्राला देण्याचा घाट घातला  जात आहे. या धरणाचे पाणी केवळ सिंचनासाठीच उपलब्ध करून देण्याची मागणी  आलेगाव परिसरातील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली  आहे.

ठळक मुद्देआलेगाव परिसरातील शेतकर्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदननिर्गुणा प्रकल्पाचे पाणी पारस वीज निर्मिती केंद्राला देण्याचा घाट

लोकमत न्यूज नेटवर्कअलेगाव (अकोला): निर्गुणा प्रकल्पाचे पाणी पारस वीज निर्मिती केंद्राला देण्याचा घाट घातला  जात आहे. या धरणाचे पाणी केवळ सिंचनासाठीच उपलब्ध करून देण्याची मागणी  आलेगाव परिसरातील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली  आहे. शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांनाही याविषयी निवेदन दिले आहे.  निगरुणा नदीवरील धरण यावर्षी साठ टक्के भरले आहे. दरवर्षी या धरणाचे पाणी  सिंचनसाठी उपलब्ध होत असते; परंतु यावर्षी पाणीटंचाईमुळे पाणी नियोजन  बैठकीत निर्गुणा प्रकल्पाचे पाणी पारस येथे देण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळ ताच आलेगाव भागातील चोंडी, पिंपरडोली, जांब, कार्ला, शेकापूर येथील शेकडो  शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, आमदार, बाळापूरचे उपविभागीय  अधिकारी, पाटबंधारे विभाग यांच्याकडे धाव घेऊन निवेदन सादर केले. निर्गुणा  प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठीच उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनात  करण्यात आली. यावर्षी खरीप हंगाम पावसाच्या लहरीपणामुळे पूर्णत: बुडालेला  आहे. त्यामुळे शेतकरी यांना रब्बी पिकासाठी पाणी मिळाल्यास त्यांचा उदरनिर्वाह  होऊ शकतो. रब्बी पिकासाठी पाणी उपलब्ध केल्यास या परिसरातील पिण्याच्या  पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे या धरणाचे पाणी पारस वीज निर्मिती केंद्राला  न देता सिंचनासाठीच देण्याची मागणी शेतकर्‍यांनी निवेदनात केली आहे. मागणी  मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी निवेदनात दिला आहे.

टॅग्स :DamधरणAkola Ruralअकोला ग्रामीण