शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा तातडीने मदत द्या, स्थायी समितीत ठराव मंजूर

By संतोष येलकर | Updated: September 2, 2022 18:11 IST

जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत ठराव मंजूर

अकोला : संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे;मात्र रब्बी हंगाम तोंडावर आला असला तरी, पीक नुकसानीची मदत शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही . त्यामुळे संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदतीचा दिलासा द्यावा, आशा मागणीचा ठराव शुक्रवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. हा ठराव शासनाकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले.

यंदाच्या पावसाळ्यात जुलै व ऑगस्टमध्ये जिल्ह्यात कधी संततधार पाऊस तर कधी अतिवृष्टी झाली. पाऊस आणि नदी व नाल्यांना पूर आल्याने जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी  दुपटीने मदत देण्याची  घोषणा शासनाकडून करण्यात आली.परंतु पोळा गेला रब्बी हंगाम तोंडावर आला असला तरी, पिकांच्या नुकसानीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.त्यामुळे संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने तातडीने पीक नुकसानीच्या मदतीचा दिलासा तातडीने द्यावा, अशी मागणी सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभेत केली.त्यानुसार यासंदर्भात सभेत ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव तातडीने शासनाकडे पाठविण्याचेही सभेत ठरविण्यात आले.जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, उपाध्यक्ष सावित्री राठोड, सभापती सम्राट डोंगरदिवे, स्फूर्ती गावंडे,  अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, समितीचे सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पीक कर्जासाठी "सीबील"ची अट नको!

रिझर्व्ह बँनकमार्फत बँकांना प्राप्त झालेल्या पत्रानुसार पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना "सीबील" ची अट लावण्यात आली आहे;मात्र पीक कर्जासाठी सीबीलची अट नसावी, अशी मागणी स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली.

किती शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे केले?

पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या, त्यानुसार किती शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले, अशी विचारणा जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेता गोपाल दातकर यांनी कृषी विभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांना सभेत केली. 

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला