शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

अकोला शहरात हॉकीला हक्काचे मैदान आणि प्रशिक्षक द्या : खेळाडूंची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 15:39 IST

अकोला : राष्ट्रीय खेळ हॉकीकरिता अकोला शहरात हक्काचे मैदान देण्यात यावे, तसेच शासनाच्यावतीने हॉकी प्रशिक्षक नियुक्त करण्यात यावे, अशा दोन प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी हॉकी खेळाडूंनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली.वारंवार मागणी करू नही शासनाने महानगरात राष्ट्रीय खेळ हॉकीचे एकही मैदान दिलेले नाही. सर्वोपचार रुग्णालय परिसरातील पोलीस हॉकी मैदानाची जागा शासकीय वैद्यकीय ...

ठळक मुद्देशहरात हॉकीचे एकही मैदान नाहीएकेकाळी अकोला शहर हॉकीकरिता प्रसिद्ध होतेआंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय हॉकी खेळाडू अकोला शहराने दिले आहेत

अकोला : राष्ट्रीय खेळ हॉकीकरिता अकोला शहरात हक्काचे मैदान देण्यात यावे, तसेच शासनाच्यावतीने हॉकी प्रशिक्षक नियुक्त करण्यात यावे, अशा दोन प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी हॉकी खेळाडूंनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली.वारंवार मागणी करू नही शासनाने महानगरात राष्ट्रीय खेळ हॉकीचे एकही मैदान दिलेले नाही. सर्वोपचार रुग्णालय परिसरातील पोलीस हॉकी मैदानाची जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे गेल्यामुळे हॉकी खेळाडूंना सरावाकरिता मैदान राहिले नाही. हॉकी खेळण्याची इच्छा असूनही विद्यार्थी वर्ग मैदानाअभावी खेळू शकत नाही. जिथे मोकळी जागा मिळाली तिथे जाऊन हॉकी खेळाडू सराव करीत आहेत, असे निवेदनात खेळाडूंनी नमूद केले आहे.एकेकाळी अकोला शहर हॉकीकरिता प्रसिद्ध होते. अकोला शहरातून ९-१० हॉकी संघ वर्षाला तयार व्हायचे. आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय हॉकी खेळाडू अकोला शहराने दिले आहेत. राज्य-राष्ट्रीयस्तर स्पर्धा अकोला शहरात वर्षातून पाच ते सहा व्हायच्या. पण, आता फक्त वर्षातून एकदा शालेय हॉकी स्पर्धेच्या वेळीच हॉकीची आठवण केली जाते, ते सुद्धा पोलीस मुख्यालय मैदान पुरते, अशी व्यथा अपर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करताना खेळाडूंनी मांडली. ज्येष्ठ हॉकीपटू तथा प्रशिक्षक रमेश शेलार, कुणाल सावदेकर, मयूर चौधरी, जतीन यादव, शुभम अढाऊ, रवी गायकवाड, शाहरू ख खान यांच्या नेतृत्वात निवेदन अपर जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. याप्रसंगी युवा हॉकीपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :HockeyहॉकीSportsक्रीडाAkola cityअकोला शहर