शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

सीबीएसई दहावी परीक्षेत मुलीच आघाडीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 12:57 IST

अकोला: सीबीएसई दहावीचा परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल शंभर टक्के लागला असून, निकालामध्ये पुन्हा मुलीच आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.

अकोला: सीबीएसई दहावीचा परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल शंभर टक्के लागला असून, निकालामध्ये पुन्हा मुलीच आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यातील सीबीएसई माध्यमिक शाळांनी घवघवीत यश संपादन केले. शहरातील नोएल स्कूल, प्रभात किड्स स्कूल, ज्युबिली सीबीएसई स्कूल, स्कूल आॅफ स्कॉलर्स हिंगणा रोड, एमराल्ड हाईट्स सीबीएसई स्कूल, जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रभातच्या प्रथमेश जोशी ९८.२ टक्के याने शाळेतून प्रथम स्थान तर तन्वी भुसारी ९७.६० टक्के हिने द्वितीय, अदिती सरदार ९७.४० हिने तृतीय प्राची धोटे ९७.२० हिने चतुर्थ आणि नंदिनी राठी ९७ हिने पाचवे स्थान पटकावले. नोएल स्कूलचा तुषार कराळे ९७.६0 याने शाळेतून प्रथम, आयुष जिवतरामानी ९७.४0 याने द्वितीय, सुमित धुळे ९६.८0 याने तृतीय तर सेजल बुटे ९५.६0 हिने चतुर्थ आणि आदेश सिरसाट ९५.४० याने पाचवा क्रमांक पटकावला. एमराल्ड हाईट्स स्कूलचा निकाल १00 टक्के लागला असून, शाळेतून ओजस चितलांगे याने ९४.२ प्रथम स्थान पटकावले. ओमकार जोशी ९३.६ याने द्वितीय, ओम पाटील ९३.४ याने तृतीय, श्रृती शेंदुरकर ९२.८ हिने चतुर्थ तर मुशफायदा सिमीन ९२.६ हिने पाचवे स्थान प्राप्त केले. स्कूल आॅफ स्कॉलर्स हिंगणा रोड येथील श्रोण वाघ याने ९७.४ टक्के मिळवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. रोहन पाटील याने ९७ टक्के द्वितीय, प्राची राठी, श्रद्धा शिंदे यांनी ९६.८ टक्के मिळवून तृतीय स्थान पटकावले. संपदा पंचभाई हिने ९६.६ चतुर्थ तर प्रसन्न धवले ९६.४ याने पाचवे स्थान प्राप्त केले. ज्युबिली इंग्लिश सीबीएसई हायस्कूल (कुंभारी)चा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेतून उत्कर्ष कंकाळ याने ९१.८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. ऋषिकेश् खवले याने ८६.६ द्वितीय तर प्रतीक जोशी याने ८२.४ टक्के गुण मिळवित तृतीय स्थान पटकावले. २१ विद्यार्थ्यांनी प्राप्त केले विविध विषयांमध्ये १०० टक्के गुणमराठीसह गणित, इतिहास, संस्कृत, माहिती तंत्रज्ञान या विषयांमध्येदेखील २१ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत. गणितात नंदिनी राठी, पार्थ नावकार, प्रथमेश जोशी व तन्वी भुसारी यांनी १०० टक्के गुण प्राप्त केले. संस्कृत विषयात अभय अवचार, आदिती सरदार, खुशी झंवर, पार्थ नावकार, प्रथमेश जोशी, रोमील सेठ व वरद वानखडे तर आयटी या विषयात भैरवी देशमुख, फिरदोस खान, गायत्री म्हैसणे आणि प्रचेता मुकुंद यांनी १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहे. अनिकेश इंगळे, श्रोण वाघ, श्रद्धा शिंदे, मधुरा देशपांडे, अदिती देशमुख यांनी मराठीमध्ये पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले. प्रसन्न ढवळे, विराज जगताप यांनी गणितात तर सात्विक शाह, श्रोण वाघ, भक्ती शेंडे, आर्या पाटोळकर, प्राची राठी यांनी सामाजिक विज्ञानमध्ये पैकीच्या पैकी गुण प्राप्त केले.मराठीतही १00 पैकी १00 गुणभाषा विषयातही म्हैसणे, हर्षल भटकर, मैथिली वानखडे व निरंजन देशमुख या विद्यार्थ्यांनी मराठी मध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहेत.

 

टॅग्स :CBSE Examसीबीएसई परीक्षाAkolaअकोलाStudentविद्यार्थी